हॉटेलमधील मसालेदार आणि ग्रेव्ही असणाऱ्या भाज्या सर्वचजण आवडीने खातात.पण या भाज्या घरी बनवताना तितक्या टेस्टी बनत नाहीत.कारण बऱ्याच वेळेला ग्रेव्ही करताना अनेक चुका होतात ज्यामुळे ग्रेव्ही ची टेस्ट बिघडते परिणामी भाजीचीही.पण अशावेळी जर एका क्रमानुसार सर्व मसाले भाजून घेतले तर नक्कीच ग्रेव्ही परफेक्ट बनू शकते.चला मग घरच्या घरी परफेक्ट आणि झटपट होणारी ग्रेव्ही कशी बनवायची हे जाणून घेऊयात.
कृती :
तेल किंवा तूप गरम झाल्यावर त्यात अख्खा गरम मसाला आणि नंतर जिरे टाका .
आता कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. आणि नंतर त्यामध्ये मीठ घाला.
कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि आले पेस्ट घाला.
यानंतर त्यात चिरलेला टोमॅटो घाला आणि परतून घ्या.
सर्व मिश्रण शिजल्यानंतर त्याला तेल सुटायला लागेल तेंव्हा त्यामध्ये धने आणि मिरची पूड किंवा तिखट घाला.
जर तुम्हाला मिसळ साठी ग्रेव्ही हवी असेल तर सगळा मसाला भाजल्यानंतर त्यामध्ये सगळ्यात शेवटी किसून घेतलेलं वाळले खोबरे एखादं मिनिटं परतून घ्या.
आता सर्व मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या. गरजेनुसार पेस्ट बनवण्यासाठी त्यामध्ये पाणी घाला.
तयार झालेली ही ग्रेव्ही तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही भाजीमध्ये घालून भाजीची टेस्ट वाढवू शकता.

