Tarun Bharat

फुटीर आमदारांविरोधात काँग्रेसकडून याचिका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर यांची याचिक : फेटाळली जाऊ नये म्हणून घेतली काळजी

प्रतिनिधी /पणजी

काँग्रेस पक्षातून फुटून भाजपवासी झालेल्या आठ आमदारांच्या विरोधात गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी अपात्रता याचिका दाखल केली असून आमदार कार्लुस फरेरा यांनी ती सभापतींसमोर सादर केली आहे.

 याचिकेत कोणतीही त्रुटी राहू नये आणि अपात्र करण्यासाठी परिपूर्ण असावी म्हणून ती सादर करण्यास थोडा उशीर झाला हे फरेरा यांनी मान्य केले. घाईघाईने तशी याचिका सादर करुन ती कायद्याच्या चौकटीत बसत नसेल तर फेटाळली जाऊ शकते परंतु आता सादर केलेली याचिका फेटाळता येणार नाही तर तिच्यावर निकाल द्यावाच लागेल, असा दावा फरेरा यांनी केला आहे.

 फेटाळली जाऊ नये म्हणून खबरदारी

सर्व बाजूंचा विचार करुन आणि फुटीर आमदार अपात्र होणारच या दृष्टीने याचिकेचा मसुदा तयार करण्यात आल्याची माहिती फरेरा यांनी दिली.

भाजपात गेलेले आठ आमदार

दिगंबर कामत, मायकल लोबो, संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई, आलेक्स सिक्वेरा, रुडाल्फ फर्नांडिस व डिलायला लोबो हे सर्व आठजण काँग्रेसचे आमदार म्हणून विजयी झाले होते. त्या सर्वांनी एक गट करुन नंतर भाजपात प्रवेश केला. काँग्रेसचे एकूण 11 आमदार निवडून आले होते. त्यातील आठ आमदारांनी पक्षांतर केल्यामुळे काँग्रेसकडे आता फक्त तीन आमदार उरले आहेत.

यापुर्वी चोडणकर यांची याचिका

यापूर्वी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उपरोक्त आठ जणांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. त्यावर अद्याप सभापतींनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. दिगंबर कामत व मायकल लोबो हे दोघे काँग्रेस पक्षात असतानाच त्यांनी पक्षाविरोधी कारवाया केल्या म्हणून त्यांच्या विरोधात अपात्रता याचिका सादर केली होती. सभापती रमेश तवडकर यांनी त्याची दखल घेऊन दोघांना नोटीसा दिल्या असून 16 डिसेंबर रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

Related Stories

डॉ. दीपक पाटील आयुर्वेद मेडिकल कॉलेज – भावी डॉक्टर्स करिता अद्ययावत संधी-

Patil_p

गोव्यातील 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर पडणार

Omkar B

राज्यातील महाविद्यालये एक सप्टेंबरपासून सुरु

Omkar B

त्या आमदारांनी राजीनामा देऊन पक्षांतर करावे पक्षांतर विरोधी समाजसेवकांची वास्कोत निदर्शने

Omkar B

कुर्टी-फोंडा येथील फुटलेली जलवाहिनी जोडली

Amit Kulkarni

गोवा डेअरीच्या बदलत्या नुकसानीच्या आकडय़ामुळे दूध उत्पादकांमध्ये संभ्रम

Amit Kulkarni