Tarun Bharat

राष्ट्रीय प्रतीकासंबंधीची याचिका फेटाळली

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सेंट्रल व्हिस्टावर लावण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रतिकात बदल करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली आहे. नव्या संसद भवनात बसविण्यात आलेल्या प्रतिकृतीत सिंहांना वेगळय़ा स्वरुपात दर्शविण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. केंद्र सरकारने स्वतःची चूक दुरुस्त करत राष्ट्रीय प्रतिकाच्या प्रतिकृतीत सुधारणा करावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.

न्यायाधीश एम.आर. शाह आणि कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सुनावणीवेळी फटकारले आहे. ‘तुम्ही डिझाइनचा निर्णय घेणार आहात का? प्रतिकृतीकडे कुठल्या नजरेतून पाहता हे तुमच्यावर निर्भर आहे. प्रतिमा किंवा इम्प्रेशन हे बुद्धी आणि मानसिकतेवर निर्भर असते. प्रतिकृतीला कुठल्याही तरतुदीच्या विरोधात ठरविले जाऊ शकत नसल्याचे म्हणत खंडपीठाने याचिकाकर्त्यांना फटकारले आहे.

अल्दानिशन रेन अणि रमेश कुमार मिश्रा या दोन वकिलांनी ही याचिका दाखल केली होती. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर लावण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रतीक चिन्हात दुरुस्ती करण्याचा निर्देश केंद्र सरकारला देण्यात यावा असे म्हणत याचिकेत राष्ट्रीय प्रतीक चिन्ह अधिनियम 2005 चा दाखला देण्यात आला होता. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर लावण्यात आलेले राष्ट्रीय प्रतीक चिन्ह स्वतःच्या मूळ स्वरुपापेक्षा अत्यंत वेगळे असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर लावण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रतीक चिन्हात दिसणारे सिंह हे सारनाथ संग्रहालयात संरक्षित प्रतीकामधील सिंहांपेक्षा वेगळे आहेत. अशोक स्तंभाचे मूळ स्वरुप वेगळे असल्याने आणि शांत-सौम्य सिंहांच्या जागी क्रोधित सिंह दर्शविण्यात आला असून हा प्रकार राष्ट्रीय प्रतिकाचा अपमान करणारा असल्याचा दावा करण्यात आला होता.

Related Stories

किम जोंग उन कोमात, बहिणीकडे सत्तासूत्रे

Patil_p

चीनच्या दादागिरीला मलेशियाचे आव्हान

Patil_p

पाकिस्तानची संसद विसर्जित

Patil_p

मॉडर्नाची लस, आशेचा नवा किरण

Patil_p

युक्रेनच्या 5 रेल्वेस्थानकांवर रशियाचा हल्ला

Patil_p

ऑस्ट्रेलियात डेल्टा व्हेरियंटचा फैलाव

Patil_p
error: Content is protected !!