Tarun Bharat

Petrol-Diesel Price : जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

महाराष्ट्रात आज पेट्रोलपंप चालकांनी संप पुकारला असून, पेट्रोल-डिझेल खरेदी बंद अशा आंदोलनाची हाक दिली आहे. फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. मात्र पेट्रोल पंप सुरु राहणार आहेत. दरम्यान 22 मे रोजी उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशातील विविध शहरांमध्ये किमतीत बदल झाला होता. मात्र 6 एप्रिलपासून इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Rate) आज कोणतीही वाढ झालेली नाही. आपल्या शहराती तसेच भारतातील महत्त्वाच्या ठिकाणाची दरवाढ जाणून घेऊया.

केरळ आणि राजस्थान सरकारनं व्हॅटमध्ये कपात केल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलचे दर इतर अनेक शहरांपेक्षा जास्त आहेत. जयपूरमध्ये पेट्रोलची किंमत 109.46 रुपये आणि डिझेलची किंमत 94.61 रुपये प्रति लिटर आहे. तर, तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.87 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर आहे.

दिल्लीत आज पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. आज मुंबईत (Mumbai) एक लिटर पेट्रोलचा दर 111.35 रुपये आणि डिझेलचा दर 97.28 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आणि डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर कोल्हापुरात (Kolhapur) पेट्रोल 111.70 रुपये तर डिझेल 96.19 रुपये प्रति लिटर तर सांगलीत पेट्रोल 111.48 रुपये तर डिझेल 95.53 दरानं विकलं जात आहे.

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलची सध्याची किंमत, शहर पेट्रोल दर डिझेल दर

दिल्ली 96.72 89.62

मुंबई 111.35 97.28

कोल्हापूर- 111.70 96.19

सांगली – 111.48 95.53

कोलकाता 106.03 92.76

चेन्नई 102.63 94.24

बेंगळुरू 101.94 87.89

हैदराबाद 109.66 97.82

पाटणा 107.24 94.04

भोपाळ 108.65 93.90

जयपूर 109.46 94.61

लखनौ 96.57 89.76

तिरुवनंतपुरम 107.87 96.

Related Stories

5 हजारांची तारणहार कमल कुंभार

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे शक्तीप्रदर्शन

Patil_p

काँग्रेसमधील वातावरण असंतुष्ट, राजीनामा देण्याचीही अनेकांची तयारी

datta jadhav

कोल्हापूर : हेरलेत आढळला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा वाहनधारकांना ‘चटका’

Patil_p

कुत्र्याचा पाठलाग करीत बिबट्या शिरला सरळ घरात

Archana Banage