Tarun Bharat

पेट्रोलचा प्रवास ७२ पैशावरुन १२० रुपयांकडे

60 वर्षात 170 टक्क्यांनी पेट्रोल दरात वाढ : इंधन दरवाढ झाली तरी वाहनांच्या मागणी संख्येत घट नाही

विद्याधर पिंपळे/ कोल्हापूर

दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होऊ लागली आहे. सन 1963 मध्ये 72 पैसे लिटर असलेले पेट्रोल आता 120 रुपये 28 पैसे असे झाले आहे. या 59 वर्षात पेट्रोलच्या दराने उच्चांक केला असून, ही वाढ लिटरमागे 170 टक्क्याने झाली आहे. दरवाढ झाली असली तरी याच्या विक्रीमध्ये मात्र घट झालेली नाही. कारण जिह्यात दरवर्षी वाढत असलेली नवीन वाहनांची संख्या व नवीन पंपाची उभारणी होत आहे.

काही वर्षापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ वाढ होणार असल्याचे भाकीत असे. यामुळे पेट्रोल पंपावर टाकी फुल्ल करण्यासाठी रांगा लागलेल्या दिसत असत. पण आता काही वर्षात हे चित्र बदलून गेले आहे. 59 वर्षांपूर्वी म्हणजेच 1963 मध्ये पेट्रोलची विक्री गॅलनमध्ये होत असे. पाच लिटर म्हणजे एक गॅलन असे. या गॅलनचा दर 3 रुपये 60 पैसे असा होता. म्हणजेच 72 पैसे लिटर असा होता. तोच दर आता 6 एप्रिलपर्यंत 120 रुपये 28 पैसे तर तर डिझेल 103 रुपये 01 पैसा असा होता. दरवर्षी जिह्यामध्ये नवीन एक लाख वाहनांची संख्या वाढत आहे.

इंधन दरवाढीमुळे वाहनधारकाकडून फुल टाकीऐवजी शंभर रूपयाच्या पेट्रोलला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. यापूर्वी पगाराच्या तारखेला पेट्रोलची टाकी फुल्ल केली जात होती. आता तेवढयाच पैशात दोन ते तीन लिटर पेट्रोल घ्यावे लागत आहे.
1984 मध्ये पेट्रोलचा दर साडेआठ रुपये इतका होता. तर नोव्हेंबर 2020 ला पेट्रोलचा दर 88 रुपये 70 पैसे तर डिझेल 76 रुपये 70 पैसे इतका होता. पेट्रोल डिझेलच्या दरात महिन्यातून दोन वेळा म्हणजेच एक व पंधरा तारखेला बदलत असे. पण गेल्या काही वर्षापासून इंधनाचा दर दैनंदिन बदलू लागल्याने पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केली आहे.

पेट्रोल दरवाढीमुळे इंधनाच्या विक्रीत घट नाही
कोल्हापूर जिह्यात दरदिवशी पेट्रोल साडेपाच लाख लिटर तर डिझेलची सहा लाख लिटर विक्री होत आहे. दरवाढीमुळे या इंधनाच्या विक्रीमध्ये घट झालेली नाही. त्या तुलनेत नवीन वाहनांची संख्या वाढली असल्याने पंपांची संख्याही वाढली असून याची संख्या 300 इतकी झाली आहे. – गजकुमार माणगावे, माजी अध्यक्ष, कोल्हापूर पेट्रोल-डिझेल असोसिएशन

कोल्हापूर जिह्यात सुमारे 15 हजार ट्रक आहेत. गेल्या काही दिवसापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. यामुळे शेजारच्या गुजरात कर्नाटक गोवा या ठिकाणी पेट्रोल डिझेल स्वस्त असल्याने वाहनधारक शेजारच्या राज्याकडे वळू लागले आहेत. – सुभाष जाधव अध्यक्ष, कोल्हापूर लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन

जिल्हयात पेट्रोल पंप : 300
दैनंदिन विक्री : पेट्रोल -5.50 लाख लिटर, डिझेल – 6 लाख लिटर
वर्षात वाहनांची वाढलेली संख्या : 84622

Related Stories

लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना लुटणाऱ्या दोन कृषी केंद्रांवर कारवाई

Archana Banage

कागल येथे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात १० मेंढरांचा मृत्यू

Archana Banage

कोरोनाबाधित पत्रकारांसाठी स्वतंत्र व्यवस्था करा

Archana Banage

करवीर : चाफोडी गावामध्ये एकजण कोरोना पॉझिटिव्ह तर एका संशयिताचा मृत्यू

Archana Banage

उसाच्या शेताला लागलेल्या आगीत २० एकर ऊस जळून खाक

Archana Banage

कोल्हापूर : राज्याच्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाला ठेंगाच; उद्योजकांतून नाराजीचा सूर

Archana Banage