Tarun Bharat

PFI Ban In India : पीएफआय संघटनेवर पाच वर्ष बंदी,केंद्राच्या निर्णयाचे एकनाथ शिंदेंनी केलं स्वागत

Advertisements

CM Eknath Shinde On PFI Ban In India : अतिरेक्यांना पैसा पुरवल्याच्या आणि त्यांना प्रशिक्षण दिल्याच्या आरोपाखाली देशभरात पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी केली होती.
केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर पाच वर्षांकरिता बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडी आणि एनआयएनं देशातील अनेक शहरांमध्ये पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी सुरु केली आहे. यात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे. टेरर फंडिंग प्रकरणात आता या आरोपींची चौकशी केली जात आहे. त्याचबरोबर या कारवाईवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची दिल्लीत बैठक झाली होती. त्यानंतर आता या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत स्वागत केले आहे. शिवाय याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

पीएफआयच्या बंदीवर काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी गोदावरीच्या काठावरील स्वामीनारायणाची मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याचा निर्णय योग्य आहे, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, केंद्र आणि राज्यातील गृहखातं चांगलं काम करत असून राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यां विरोधात कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी गोदावरीच्या काठावरील स्वामीनारायणाची मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा केली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

Related Stories

सातबारा हॉटेलमध्ये अवैद्य दारूसाठा जप्त, गांधीनगर पोलिसांची कारवाई

Archana Banage

Kolhapur; राजर्षी शाहूंची जयंती लोकोत्सव म्हणून साजरा करणार

Abhijeet Khandekar

डॉ. प्रणोती संकपाळ हिचे UPSC परीक्षेत यश

Archana Banage

कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना नव्या संधी उपलब्ध

datta jadhav

कासची उंची वाढली… आमच्या रस्त्याचं काय?

Patil_p

कोव्हिड-19 लसीकरण

Patil_p
error: Content is protected !!