Tarun Bharat

पीएफआयचे ‘लक्ष्य’ नरेंद्र मोदी, बिहारमध्ये रचला होता हत्येचा कट

ईडीचा खळबळजनक दावा : केरळमध्ये झाले नियोजन : ‘पाटणा रॅली’त होता हल्ला करण्याचा कट : उत्तर प्रदेशातही हल्ल्यांचे कारस्थान : प्रशिक्षण शिबिरेही उभारल्याचे स्पष्ट

Advertisements

नवी दिल्ली/वृत्तसंस्था

पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जुलै 2022 च्या पाटण्यातील रॅलीला लक्ष्य करण्यात आले होते. तसेच उत्तर प्रदेशमधील संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी दहशतवादी मॉड्य़ूलसह इतर हल्ल्यांच्या तयारीत पीएफआय संघटना गुंतली होती, असा दावा ईडीने (ED) न्यायालयात केला आहे. पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियावरील (PFI) छापासत्राच्या कारवाईनंतर ही माहिती समोर आली आहे.

22 सप्टेंबर रोजी एनआयए-ईडीने ‘ऑपरेशन ऑक्टोपस’अंतर्गत 15 राज्यांमधील पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाच्या 93 ठिकाणांवर छापे टाकले. गुरुवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या या कारवाईत तपास यंत्रणेने देशभरातून 106 हस्तकांना अटक करण्यात आली. त्यात संघटनेचे प्रमुख ओएमएस सलाम यांचाही समावेश होता. या संपूर्ण कारवाईत एनआयए आणि ईडीचे 500 अधिकारी शोध-छापासत्रात सहभागी झाले होते. आता याप्रकरणी तपास यंत्रणेने हल्ल्यांच्या कटाचा मोठा दावा केला आहे. तसेच कोचीमध्ये एनआयएने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पीएफआयने तरुणांना इस्लामिक राज्य निर्माण करण्यासाठी लष्कर-ए-तोयबा आणि इसिससारख्या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे म्हटले आहे.

कोझिकोडमधून अटक करण्यात आलेल्या पीएफआय हस्तक शफीक पायेथच्या रिमांड नोटमध्ये ईडीने काही खळबळजनक बाबी नमूद केल्या आहेत. 12 जुलै रोजी पाटणा येथे पंतप्रधानांच्या रॅलीमध्ये हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता. या कटासाठी पूर्ण रसद शफीक पायेथने पुरविल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. संघटनेने पंतप्रधानांवर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरही घेतले होते. या हल्ल्याच्या माध्यमातून 2013 सारखी घटना घडवून आणण्याचा पीएफआयचा विचार होता, असेही तपास यंत्रणेने सांगितले. ऑक्टोबर 2013 मध्ये पाटणा येथील गांधी मैदानावर भाजपचे तत्कालीन स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्या सभेत बॉम्बस्फोटांची मालिका घडली होती.

हे ही वाचा : दसरा मेळाव्याबाबत राज ठाकरेंनी दिला होता योग्य सल्ला, पण मुख्यमंत्र्यांनी केलं दुर्लक्ष

विदेशातून आर्थिक रसद
पीएफआयला आखाती देशातून निधी मिळतो. सर्व पैसा हवालाद्वारे येतो. तपास यंत्रणांनी यावषी पीएफआयचे 120 कोटी रुपये जप्त केले आहेत. पायेथने कतारमधून 40 लाख रुपयेही ट्रान्सफर केले होते, जे बेकायदेशीररीत्या पाठवले होते, असे ईडीने न्यायालयात सांगितले. पीएफआयने परदेशात निधी गोळा केला आणि इतर माध्यमातून भारतात पाठवला. पीएफआय/सीएफआय आणि इतर संबंधित संघटनांच्या सदस्य, कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱयांच्या खात्यातूनही निधी पाठवण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. पीएफआयने असा निधी तसेच देणग्या गोळा करताना नियमांचे पालन केले नाही.

पीएफआयचे ‘मिशन 2047′
येत्या 25 वर्षांमध्ये, म्हणजेच 2047 पर्यंत भारताचे इस्लामीकरण करण्याचे पीएफआयचे ध्येय आहे, असा आशय असलेली कागदपत्रे बिहारमध्ये पाटणानजीक असणाऱया फुलवारी शरीफ येथील पीएफआयच्या कार्यालयात सापडली आहेत. गुरुवारी घातलेल्या धाडीमध्येही यासंबंधीची कागदपत्रे एनआयएच्या हाती लागली असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. यासंबंधात चार हस्तकांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे.

प्रशिक्षण, गुन्हेगारी कटांमध्ये सहभाग
पीएफआयचे नेते हवालाद्वारे पैसे उभे करून प्रशिक्षण शिबिरे आयोजित करतात. यासोबतच त्यांचे सदस्य देशभरात अनेक गुन्हेगारी कटात सामील आहेत. याप्रकरणी एप्रिलपासून तपास सुरू होता. सीएए कायदा आणि हाथरससारख्या घटनांमध्येही या संघटना लोकांना सरकारविरोधात भडकावण्यात गुंतल्या आहेत, असेही तपास एजन्सीने न्यायालयाला सांगितले.

Related Stories

कानपूरमध्ये अपघातात 26 भाविकांचा मृत्यू

Patil_p

केक में अंडा होगा क्या?

Patil_p

महिला कॅबिनेट मंत्र्यांचाउत्तर प्रदेशात कोरोनाने मृत्यू

Patil_p

भारत-अमेरिका करणार एकत्र नौदल सराव

Patil_p

देशात 1.50 कोटी लोक कोरोनाच्या विळख्यात

datta jadhav

इम्फाळमध्ये आयईडी स्फोट

Patil_p
error: Content is protected !!