ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील लसीकरणाबाबत माहिती देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, सद्य स्थितीत दिल्लीत लशीची प्रचंड कमतरता जाणवत आहे. कोवॅक्सिनचा साठा मागील 13 दिवसांपूर्वीच संपला आहे. त्यातच आज कोविशिल्ड लस देखील संपली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन लस उत्पादक कंपन्या- PFIZER आणि Moderna यांनी दिल्लीला लस देण्यास नकार दिला आहे. त्यामुुळे या मुद्द्यावर केंद्र सरकारशी आम्ही चर्चा करणार आहोत.
पुढे ते म्हणाले, आम्ही लस विकत घेण्याबाबत PFIZER आणि Moderna यांच्याशी चर्चा केली होती. परंतु त्यांनी आम्हाला नकार दिला, त्यामुळे आम्ही आता केंद्र सरकारशी बोलणार आहोत.
यापुर्वी पंजाब सरकारनेही लशीसाठी Moderna कंपनीशी संपर्क साधला होता. पंजाबचे वरिष्ठ आयएएस आणि कोविड लसीकरणाचे नोडल अधिकारी विकास गर्ग यांनी रविवारी सांगितले की, सरकारने लशीबाबत Moderna कंपनीशी संपर्क साधला होता, परंतु कंपनीने त्यांच्याशी थेट व्यवहार करण्यास नकार दिला आणि ते लशीबाबत केंद्राशी बोलणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी याबाबत माहिती दिली. दुसरी लाट ओसरत असून तिसऱ्या लाटेपूर्वी ही काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये
- 6000 ऑक्सिजन सिलिंडर चीनमधून मागविण्यात आले आहेत. त्यातील 4400 सिलिंडर आले असून अजून 1600 येणे बाकी आहेत.
- 2000 सिलिंडर एका डेपोमध्ये ठेवता येतील असे तीन डेपो आम्ही तयार करत आहोत.
- HCL आणि गिव इंडिया फाऊंडेशनकडून डोनेशन मिळाले आहे.
मोठ्या संख्येने कंसेंट्रेटरची खरेदी करण्यात आली आहे. टँकर देखील मागविण्यात आले आहेत. हे 25 लीटरचे सिलिंडर आहेत.
ब्लॅक फंगस :
- यासाठी आम्ही सेंटर बनविले आहे. पण अजून आम्हाला गोळ्या मिळालेल्या नाही आहेत.
- सद्य स्थितीत दिल्लीत ब्लॅक फंगसचे 500 रुग्ण आहेत. एका रुग्णांसाठी रोज 4 गोळ्या याप्रमाणे एका दिवसासाठी 2 हजार गोळ्यांची आवश्यकता आहे.