बेळगाव : केएलएस गोगटे पीयू सायन्स कॉलेजच्या भौतिकशास्त्रच्या प्राध्यापिका दीप्ती कुलकर्णी यांनी राणी चन्नम्मा विद्यापीठातून पीएचडी संपादन केली. त्यांनी ‘सिंथेसीस ऍण्ड करेक्टरायझेशन ऑफ मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर्स फॉर ऑटो इलेक्ट्रॉनिक डीव्हाईस ऍप्लिकेशन’ या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांना चन्नम्मा विद्यापीठाचे भौतिकशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक व केएलईचे कुलसचिव डॉ. एन. एच. अयाचित यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रा. दीप्ती यांनी यापूर्वी नॅनो तंत्रज्ञानावर आधारित प्रगत सौर सेल्स आणि इलेक्ट्रोकेमिकल सेन्सर्सच्या विकासावर शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.


previous post
next post