Tarun Bharat

औषध निर्यात 4 टक्के वाढली

7 महिन्यात 14 अब्ज डॉलर्सची निर्यात

वृत्तसंस्था/ मुंबई

एप्रिल ते ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये भारताची औषध निर्यात 4 टक्के इतकी वाढत 14.57 अब्ज डॉलर्सची झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सरकारच्या एका अधिकृत समितीकडून ही माहिती दिली गेली आहे.

मागच्या महिन्यामध्ये नकारात्मक वातावरण असतानाही औषध निर्यातीत वरील काळामध्ये वाढ नोंदविली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाअखेर 27 अब्ज डॉलर्सची औषध निर्यात होऊ शकेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे. मागच्या आर्थिक वषी 24.62 अब्ज डॉलर्सच्या औषधांची निर्यात करण्यात आली होती. जुलैमध्ये निर्यातीमध्ये चांगलीच घसरण दिसून आली होती. मात्र, त्यानंतर सप्टेंबरमध्ये मात्र औषध निर्यातीने पुन्हा तेजीकडे कल दर्शविला. सप्टेंबरमध्ये 8.47 टक्के इतकी वाढ निर्यातीत दिसली. ऑक्टोबर महिन्यामध्ये मात्र निर्यात 5 टक्क्मयांनी कमी राहिली होती.

या देशांना निर्यात

अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, युरोप आणि आफ्रिका या देशांना भारताने 67 टक्के इतकी औषधाची निर्यात केली आहे. रशिया आणि युपेन यांच्यातील युद्धामुळे नकारात्मक वातावरण असतानाही भारताने औषध निर्यातीच्या बाबतीमध्ये लक्षणीय कामगिरी पार पाडली आहे, असे तज्ञांनी मत नोंदविले आहे.

Related Stories

राजीव अगरवाल सांभाळणार सॅमसंगची धुरा

Patil_p

ऍथर एनर्जी वाढवणार दुचाकींचे उत्पादन

Patil_p

इंडसइंड बँकेचा समभाग घसरणीत

Patil_p

गुगल मॅपमध्ये लवकरच अमिताभ बच्चन यांचा आवाज

Patil_p

बजाज ऑटोचा नवीन प्रकल्प पुण्यात

Omkar B

देशाची 40 टक्केपेक्षा अधिकची संपत्ती 1 टक्का श्रीमंतांकडे

Patil_p