Tarun Bharat

सेंट जोसेफ संघाकडे फिनिक्स चषक, सेंट झेवियर्स उपविजेते

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिल आयोजित 17 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत सेंट जोसेफ कॉन्व्हेंट संघाने अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. दिशा डोंगरेला उत्कृष्ट आघाडीची फुटबॉलपटू बहुमानाने गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेंट जोसेफ कॉन्व्हेंट संघाने सेंट झेवियर्स संघाचा 5-4 असा पराभव झाला. सेंट जोसेफतर्फे सायली शिरोडकर, झिया मुल्ला, शालिन पडिवाल, सिल्व्हिया गोम्स, तनिष्का लगाडे यांनी गोल केले तर झेवियर्सतर्फे मंजुशा पाटील, अलिशा ब्रोजेस, तनिष्का सालगुडे, लक्ष्मी कांबळे यांनी गोल केले. या विजयानंतर सेंट जोसेफ संघाचा मुख्याध्यापिका व शिक्षक वर्गाने खास गौरव केला.

Related Stories

विवाहितेवर हल्ला तर मुलाचा गळा चिरून खून..!

Nilkanth Sonar

कंग्राळी बुदुक बसथांब्यावर गुटखा खाणाऱयांचा बंदोबस्त करा

Amit Kulkarni

बिम्सच्या कारभारावर पालकमंत्र्यांची नाराजी

Patil_p

एडीजीपींकडून संवेदनशील भागाची पाहणी

Amit Kulkarni

मोटारसायकल चोरीप्रकरणी दोघा जणांना अटक

Omkar B

मराठा बँकेतर्फे जिजाऊ-विवेकानंद जयंती

Patil_p
error: Content is protected !!