बेळगाव : फिनिक्स पब्लिक स्कूल होनगा यांच्यावतीने रौप्य महोत्सव निमित्त 25 वी फिनिक्स चषक आंतरशालेय मुलींच्या 17 वर्षो खालील फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स स्कूलने भगवान महावीर जैन रेसिडेन्सी स्कूलचा 7-0 असा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. फिनिक्स स्कलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूने उपांत्य फेरीत यजमान फिनिक्स पब्लिक रेसिडेन्सी होनगा संघाचा 4-0 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. यावेळी कर्णधार वसुंधरा चव्हाण 2, साक्षी चिटगी व श्रावणी सुतार यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. अंतिम फेरीत सेंट झेवियर्स संघाने भगवान महावीर जैन रेसिडेन्सी स्कूलचा 7-0 असा एक तर्फे पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. सेंट झेवियर्स स्कूलतर्फे श्रावणी सुतार, साक्षी चिटगी, इफाह अत्तार, यांनी प्रत्येकी 2 तर कर्णधार वसुंधरा चव्हाणने 1 गोल केला. बक्षीस वितरण समारंभात फिनिक्स हायस्कूलचे चेअरमन विवेकराव पाटील, फिनिक्स हायस्कूलच्या प्राचार्या तैसिन मकानदार, उपप्राचार्या रामेश्वरी चावरिया यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू- वसुंधरा चव्हाण सेंट झेवियर, श्रावणी सुतारला अष्टपैलू फुटबॉलपटू म्हणून आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.प्रमुख पंच म्हणून रॉयस्टन जेम्स, विष्णू दावणेकर, समर्थ बांदेकर यांनी काम पाहिले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महांतेश गवी व सुनील देसाई, अरुण कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Previous Articleसिद्धांतची कर्नाटक संघात निवड
Next Article बॅडमिंटन स्पर्धेत स्तुती कित्तूरला उपविजेतेपद
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.