Tarun Bharat

फिनिक्स, एमआर भंडारी संघांची विजयी सलामी

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

हॉकी बेळगाव संघटने तर्फे आयोजित आंतरशालेय व महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत उद्घाटन दिवसी फिनिक्स, एमआर भंडारी संघाची विजयी सलामी.

टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर आयोजित  उद्घाटत प्रसंगी प्रमुख पाहुणे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, शिवाजी जाधव, धारु चाळके, उत्तम शिंदे, रमेश गुर्जर, खलीक बेपारी, नामदेव सावंत, प्रकाश कालकुंद्रीकर, दीपक गोरे, परशुराम हणमंताचे, विनोद पाटील, चेतन, प्रफुल्ल, धीरज धुरी, गौरव जाधव, वेदराज, प्रशांत मंकाळे, प्रशांत जाधव, माजी उपमहापौर संजय शिंदे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत इस्लामिया, बाशिबान, मदनी, ज्ञानमंदीर, एमआर भंडारी, एमव्ही हेरवाडकर, कँटोनमेंट, शानभाग, सेंट जॉन काकती, जीजी चिटणीस, फिनिक्स तसेच जीएसएस, गोगटे, लिंगराज, बीके कॉलेज, केएमए कॉलेज बेडकीहाळ महाविद्यालय संघांनी सहभाग घेतला आहे.

उद्घाटन दिवशी पहिल्या सामन्यात मुलींच्या गटात फिनिक्सला सेंट जॉन काकती सघ्ंााने 0 बरोबरीत रोखले. फिनिक्सने भंडारी संघाचा 2-0 असा पराभव केला. फिनिक्सतर्फे श्रेया मोहिते व श्रेया निंगुडे यांनी प्रत्येकी 1 गोल केले. मुलांच्या सामन्यात एमआर भंडारीने व्हीएम शानभागचा 9-0 असा पराभव केला. भंडारीतर्फे यशवंत बजंत्रीने 3, सुजल डिगाइने 2, आदित्य पाटीलने 2 तर प्रविण जुटपण्णवर व अशोक यळ्ळुरकरने प्रत्येकी 1 गोल केला.

Related Stories

गणेशोत्सवात आरोग्य उत्सवाची संकल्पना

Patil_p

कंग्राळी बुद्रुक येथील मराठी शाळा कोसळण्याचा धोका

Amit Kulkarni

पाणीपुरवठय़ात पुन्हा कपात, महिलांचा कॅन्टोन्मेंटवर मोर्चा

Amit Kulkarni

सलगर अमृततुल्य चहाचे उद्यमबाग येथे उद्घाटन

Amit Kulkarni

चोर्ला महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी

Amit Kulkarni

कार्तिकी एकादशीनिमित्त वडगाव विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यक्रम

Patil_p