अलीकडे फोन हॅक करण्याचे प्रकार वाढत आहेत. आपणही या प्रकाराला बळी पडू शकतो, जर योग्य ती खबरदारी घेतली नाही तर. सध्या आपला स्मार्टफोन हा हॅकर्ससाठी आपली वैयक्तिक माहिती चोरण्याचा किंवा आपल्या फोनवरील हालचालींवर लक्ष ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग बनला आहे. हॅकर्स आपल्याला विविध मार्गाने फसवत असतात. सर्वोत्कृष्ट अँड्रॉईड हॅकिंग ऍप्स आणि त्यांचे वैशिष्टय़ ह्या लेखामध्ये देत आहोत. प्रत्येक फोन वापरणाऱयाला हे माहिती असणे गरजेचे आहे.
सध्या आपला स्मार्टफोन हा हॅकर्ससाठी आपली वैयक्तिक माहिती चोरण्याचा किंवा आपल्या फोनवरील हालचालींवर लक्ष ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग बनला आहे. हॅकर्स आपल्याला विविध मार्गाने फसवत असतात. खोटय़ा लिंक्स पाठवून, फोनवरुन एखादे ऍप इन्स्टॅल करण्यास सांगून, घाबरवून आपला स्वार्थ पदरात पाडून घेत असतात.
मग असे कोणते ऍप आहेत जे आपल्या फोनवर इन्स्टॉल होऊन आपल्या फोनवरील डेटा हॅकर्सच्या हवाली करतात. हे ऍप्स इतके उत्कृष्ट बनविले आहेत की आपला फोन हॅक झाला आहे हे समजणे थोडे मुश्कीलच होऊन जाते. म्हणून नेहमी आपल्या फोनवर म्हणजे प्रोग्राम, मेमरी, बॅटरी पॉवर इत्यादी लक्ष ठेवून असणे आवश्यक आहे.
सर्वोत्कृष्ट अँड्रॉईड हॅकिंग ऍप्स आणि त्यांचे वैशिष्टय़ ह्या लेखामध्ये देत आहे. प्रत्येक फोन वापरणाऱयाला हे माहिती असणे गरजेचे आहे. ‘हा माझा फोन हॅक होऊ शकतच नाही’ असा आत्मविश्वास जर कोण बाळगत असेल तर ते खुळेपणाचे लक्षण आहे असे समजावे.
AndroRAT – हे एक व्हर्सटाईल Android ऍप आहे जे अँड्रॉईड स्मार्टफोन किंवा डिव्हाइसवर रिमोट ऍक्सेस द्वारा इन्स्टॉल करता येते आणि अँटी-व्हायरस स्कॅनरद्वारे शोधता येत नाही. AndroRAT हे 2012 मध्ये रिलीझ केलेले अँड्रॉईड हॅकिंग ऍप आहे. हे एक रिमोट ऍक्सेस ऍप आहे जे दुसऱया ठिकाणावरुन Android सिस्टम ऍक्सेस करु शकते. ह्याची वैशिष्टे म्हणजे अँटी-व्हायरस स्कॅनरद्वारे ते शोधता येत नाही, तसेच फोनच्या ब्राउझरद्वारे प्रवेश करता येतो. फोनचे सिम कार्ड तपशील, कॉन्टॅक्ट, गॅलरी फोन IP ऍडेस ह्यावर ताबा सहज मिळवता येतो व हॅकरला अत्यंत सफाईने फोन नियंत्रित करता येतो.
DroidSheep फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडिया खाती व इतर मेसेजिंग ऍप्स हॅक करण्यासाठी हे सर्वात कार्यक्षम मोबाइल हॅकिंग ऍप आहे. DroidSheep हे हॅकिंग ऍप्स वायफाय कनेक्शन वापरून सिक्मयुर नसलेल्या वेब ब्राउझरद्वारे प्रवेश घेतं. तसेच आपली सिक्मयुरिटी उघड करून नेटवर्कद्वारे प्रवेश मिळवते. DroidSheep ऍपमुळे फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारखे सोशल मीडिया मेसेजिंग ऍप्स हॅक करणे सोपे होऊन जाते. सोशल मीडिया खाती हॅक करणाऱयांचे हे पसंतीचे ऍप आहे. DroidSheep द्वारे हॅक केलेले लॉग्स डिलीट करता येतात, तसेच कुकीजबद्दल रिअल-टाइम माहिती मिळवता येते. जेणे करुन कोण कुठले साईट्स पाहात आहे हे लक्षात येते. सिस्टीमची सुरक्षा भेदण्यास सोपे. असे हे ऍप अत्यंत घातक समजले जाते.
mSpy हा एक प्रीमियम आणि सर्वोत्तम अँड्रॉईड हॅकिंग ऍप्सपैकी एक आहे. मुळात हे आपल्या मुलांच्या किंवा कर्मचाऱयांच्या ऑनलाइन हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी बनवले गेले आहे मात्र सध्या हॅकर्स हे फोन वाईट कामासाठी वापरत आहेत. mSpy द्वारे स्मार्टफोनमधील सर्वकाही पाहता येते तसेच ऍक्सेस करता येते. mSpy अँड्रॉईड, आयओएस, विंडोज आणि मॅक सह सर्व प्रमुख ऑपरेटींग सॉफ्टवेअरवर
चालते.
Aispyer – अँड्रॉईड सुरक्षित आणि विश्वसनीय मोबाइल फोन ट्रकरसाठी सर्वोत्तम हॅकिंग ऍप्सपैकी एक आहे. एक मल्टी-फंक्शनल गुप्तपणे काम करणाऱया ऍप्सपैकी एक आहे. हे व्हॉट्सअप, फेसबुक, ऍप्स, फोन नंबर, वेब हिस्ट्री, जीपीएस, एसएमएस, ईमेल, फोटो, किलॉगर, कॅलेंडर, स्कायपे, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम यांचा मागोवा अत्यंत चांगल्याप्रकारे घेता येतो.
गेम गार्डियन – हे Android साठी सर्वोत्तम गेम हॅकिंग ऍप्सपैकी एक आहे. हा ऍप तुमच्या अँड्रॉइड डिव्हाइसेसवर उपलब्ध असलेला जवळजवळ प्रत्येक गेम हॅक करु शकते. म्हणजे अत्यंत लोकप्रिय PUBG गेमदेखील हॅक करण्याची क्षमता ह्या
ऍपमध्ये आहे. कोणतेही गेम्स हे मूलतः तुमच्या डिव्हाइसच्या RAM चालू असतात. हे ऍप ह्या चालू असलेल्या गेमच्या स्क्रिप्ट्समध्ये बदल करते. ज्यामुळे कोणताही गेम हॅक होऊ शकतो. कोणतेही गेम रुट केलेल्या डिव्हाईसवर चालते. जर तुमचे डिव्हाइस रूट केलेले नसेल तर हमखास फोनवरील गेम हॅक होऊ शकतो व तुमचा डेटा चोरला जाऊ शकतो.
zAanti हा ड्रॉईडशिप सारखा किंवा त्याला पर्याय म्हणून हॅकर्स वापरतात. मात्र Droid Sheep पेक्षा Zanti खूप प्रगत आहे. ह्याचे कंट्रोल्स फोन किंवा सिस्टीमचे पासवर्ड क्रॅक करू शकता, किंवा वायफाय हॅक करण्यासाठी ह्याचा वापर करता येतो. हॅकर्स त्यांना पाहिजे ती वेबसाईट आपल्या फोनवर ब्लॉक करु शकतात. ह्या व्यतिरिक्त एसीमार्केट, वायफायकिल, ड्रॉईडएसएसएच, नेटवर्क मॅपर, स्नीफरवायकॅप, हॅकोड, नेटवर्कस्नुफर, शार्करुट असे एक ना अनेक ऍप्स व प्रोग्राम उपलब्ध आहेत. ह्याचा वापर करुन हॅकर्स आपल्या फोनवरील डेटा चोरत असतात. आपला फोन हॅक झाला आहे हे कळणार कसे? मुळात आपण फोन वापरत असताना निर्धास्तपणा आपल्यामध्ये जरा जास्तच असतो. ह्याचमुळे निष्काळजीपणाकडे आपण झुकले जातो. आपल्या फोनवर विविध ऍप्स इन्स्टॉल करतो, काढूनपण टाकतो. आपण बऱयाचदा एखादे एपीके (इन्स्टॉल करण्यासाठी लागणारी फाईल) नेटवरुन डाऊनलोड करुन घेतो. हे पाहात नाही की ती कोणत्या साईटवरुन घेतली आहे, त्याची विश्वासार्हता काय आहे. अर्थात हे एकच कारण नाही, तर अनोळखी फोनद्वारे पाठविलेले मेसेज, किंवा ऍप इन्स्टॉल करण्यासंबंधी घातली जाणारी गळ ह्यालाही आपण बळी पडत असतो. हे ओळखण्यासाठी थोडे सजग राहाणे आवश्यक आहे. बऱयाचदा इंटरनेट डेटा न वापरता ही संपत असतो. त्यावेळी असे काही ऍप बॅग्राऊंडला सुरु असू शकतात. ह्याचाही मागोवा घेणे आवश्यक आहे. काहीवेळा हे ऍप बॅटरी पॉवर जास्त वापरतात. जर असे काही आढळले तर अलर्ट व्हावे. अर्थात कोणता तांत्रिक (हार्डवेअर) प्रॉब्लेम नाही ना याचीही खात्री करावी. काही वेळेस मोबाईलची कार्यक्षमता बिघडते. जर तुमच्या फोनमधील ऍप्स वारंवार हँग होत असतील, किंवा फोन उघडत नसेल किंवा फोन खूप हळू चालत असेल किंवा अचानक स्क्रीन काम करणे बंद करत असेल तर फोन हॅक झाल्याची लक्षणे असू शकतात. मात्र असे होत असताना पहिल्यांदा हार्डवेअर प्रॉब्लेम नाही ना याची खात्री करुन घ्यावी. तसेच काही अपरिचित ऍप्स तुम्ही न करता डिव्हाइसवर डाउनलोड झाले आहेत का हे पहावे. असे असेल तर ते हॅकरचे काम देखील असू
शकते.
वरील सर्व गोष्टींची शक्मयता लक्षात घेऊन आपला फोन हॅक झाला नाही याची खात्री करुन घ्यावी. तज्ञांची मदत घेऊन कंक्लुजनवर यावे. आपला फोन व डेटा हा मौल्यवान आहे याची काळजी आपणच घ्यायची आहे. सावध रहा सुरक्षित रहा.
– विनायक राजाध्यक्ष