Tarun Bharat

फोन टॅपिंग प्रकरण : पुणे पोलीस आज नाना पटोलेंचा जबाब नोंदवणार

ऑनलाईन टीम / पुणे :

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात (rashmi shukla Phone tapping case) पुणे पोलीस आज मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांचा जबाब नोंदवणार आहेत. रश्मी शुक्ला यांनी अमजद खान (amjad khan) नावाने नाना पटोलेंचे फोन टॅप केले होते.

महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राज्यमंत्री बच्चू कडू, एकनाथ खडसे, आशिष देशमुख, संजय काकडे, नाना पटोले यांच्यासह काही नेत्यांचे फोन बोगस नावाने रश्मी शुक्ला यांनी टॅप केले होते. बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्यांचीही चौकशी सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणात अमजद खान या नावानं नाना पटोलेंचा फोन टॅप केल्याची माहिती आहे. अमजद खान हा अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी चालवत असून त्याचा पर्दाफाश करण्यासाठी गृह विभागाकडे त्यांनी मागितली होती. त्यावेळी नाव अमजद खान असलं तरी मोबाईन नंबर मात्र नाना पटोले यांचा देण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. आज दुपारी 2 वाजता पुणे पोलीस नाना पटोलेंचा मुंबईत जबाब नोंदवणार आहेत.

Related Stories

माजी खासदार पप्पू यादव यांना अटक

Archana Banage

सुप्रिया सुळेंनी ‘या’ कारणासाठी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती

Archana Banage

मुकेश अंबानी-एकनाथ शिंदेंची ‘वर्षा’वर भेट; रात्री उशिरा बंद दाराआड चर्चा

datta jadhav

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध राजस्थानचे तीन‘तेरा’दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध राजस्थानचे तीन‘तेरा’

Omkar B

गोपाळ समाजातील ५२ लाभार्थ्यांना घरकुल योजनेचे वीस लाख वाटप

Archana Banage

कलेतून संदेश देणारे कलाकार आंदोलनाच्या पवित्र्यात

Archana Banage