कर्नाटकच्या शिक्षण विभागातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यात होणाऱ्या कर्नाटक शिक्षक भरती परीक्षेचे ( TET ) प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. एका उमेदवाराच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर अभिनेत्री सनी लिओनीचे छायाचित्र आढळले आहे.
या प्रकरणी बीसी नागेश यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ‘उमेदवाराने स्वतःचा फोटो अपलोड करावयाचा असतो, सिस्टीम फाईलमध्ये जो फोटो जोडलेला असतो, तो सिस्टीम अपलोड करते. जेव्हा उमेदवाराला विचारण्यात आले की तिने सनी लिओनीचा फोटो टाकला आहे, तेव्हा तिने सांगितले की तिच्या पतीच्या मित्राने तिचे तपशील अपलोड केले आहेत. विभागाने एफआयआर नोंदवला असून आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.