प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व तालुका फोटो आणि व्हिडीओग्राफर्स असोसिएशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्प येथील शानभाग हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. सुभाष फोटो समुहाचे संचालक सुभाष ओऊळकर, सामाजिक कार्यकर्ते आर. एम. चौगुले, संघटनेचे अध्यक्ष डी. बी. पाटील, उपाध्यक्ष संतोष पाटील, सचिव संजय हिशोबकर, बाबा रामण्णावर, विनोद कट्टी, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी, डॉ. नीता देशपांडे, अजित शानभाग यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
कॅमेरा क्लिक करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भरमा मोटरे यांनी स्वागत केले. मान्यवरांनी फोटोग्राफी व फोटोग्राफर्स यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी असोसिएशनचे सदस्य नितीन महाले, दीपक वांदे, दिवटे, विनायक चोडणकर, अनंत पाटील, विनायक कोकितकर, राम परदेशी, अनिल बर्गे, बाळू सांगुकर, नामदेव कोळेकर, सचिन कोळेकर उपस्थित होते. संदीप मुतगेकर यांनी आभार मानले. यानिमित्त रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.