Tarun Bharat

45 लाख रुपयांशी उशी

Advertisements

इतक्या रकमेत  येते 3 बीएचके घर

या जगात अशा असंख्य गोष्टी आहेत, ज्या प्रमाणाबाहेर महाग आहेत, काही मूल्यवान गोष्टींची किंमत पाहून आम्ही अवाप् होऊन जातो. जगातील सर्वात महागडी उशी नीलम, सोने आणि हिऱयाने मढविलेली आहे. नेदरलँडच्या फीजियो थेरपिस्ट ‘थिज्स वँडर हिल्स्ट’ने 15 वर्षांची कठोर मेहनत आणि संशोधनानंतर ही  उशी तयार केली आहे.

या उशीची प्रारंभिक किंमत 57 हजार डॉलर्स (सुमारे 45 लाख रुपये) आहे. कथितपणे उशीमध्ये इजिप्तमधील कापूस, मखमली रेशीम आणि नॉन टॉक्सिक डच मेमाहेरी फोम आहे, ज्याला नेदरलँडचे फीजियो थेरपिस्ट थिज्स वँडर हिल्स्ट यांनी तयार केले आहे.

झोपशी निगडित आजार दूर होणार

किमती कापडासह उशीला लक्झरी अनुभूती देण्यासाठी सोने, नीलम, हीऱयाने सजविण्यात आले आहे. या उशीच्या वापरामुळे झोपेसंबंधी आजार दूर होतील असा दावा थिज्स वँडर हिल्स्ट यांनी केला आहे. यात एक रोबोटिक मिलिंग मशीन कापसाची निर्मिती करते. याच्या झिपमध्ये 4 हिरे आणि एक नीलम बसविण्यात आला आहे.

प्रत्येकासाठी विशेष प्रकार

प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या बॉक्समध्ये ही उशी ठेवण्यात आली आहे. प्रत्येक खरेदीदाराला उशीचे एक विशेष वर्जन मिळणार आहे. ग्राहकाची मान, डोके आणि खांद्यांचे अचूक माप घेण्यासाठी 3डी स्कॅनरचा वापर केला जाईल. मग त्यानंतर रोबोटिक मशीनद्वारे उशीला डच मेमोरी फोमद्वारे भरले जाईल. ही उशी वापरकर्त्याच्या डोक्याच्या आकारानुरुप असणार आहे.

Related Stories

आकाशातून उंदरांवर पाडविले जाणार विष

Patil_p

दसऱ्यासाठी देवतांच्या मूर्तीना कलाकुसरीच्या वस्त्रांचा साज!

Rohan_P

झारखंड : ऑनलाईन अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे नाही स्मार्टफोन, लढवली ‘ही’ शक्कल

Rohan_P

टाकलेल्या अन्नामुळे पृथ्वीसाठी संकट

Patil_p

तारांमध्ये अडकलेल्या पक्ष्यासाठी आणले हेलिकॉप्टर

Patil_p

‘दगडूशेठ’ च्या श्रीं ची प्रतिष्ठापना आणि ऑनलाईन उत्सव शनिवारपासून

Rohan_P
error: Content is protected !!