Tarun Bharat

गुलाबी रंगाचे सरोवर

वैज्ञानिकांसमोर रहस्य कायम

लहानपणापासून आपण जेव्हा कधी नदी, समुद्र, तलाव किंवा झऱयातील पाणी पाहिले असेल तेव्हा ते निळय़ा रंगाचे दिसून आले, परंतु अनेक ठिकाणी निळय़ा रंगाच्या अनेक छटा दिसून आल्या असतील. परंतु पाण्याला मूळात रंग नसतो. जगात एक असा सरोवर आहे, ज्याचे पाणी गुलाबी रंगाचे आहे. हा प्रसिद्ध सरोवर ऑस्ट्रेलियात असून त्याचा गुलाबी रंग एखाद्या बबल गमसारखा दिसून येतो.

ऑस्ट्रेलिया हा देश अनेक विचित्र ठिकाणे आणि अजब प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु येथील काही सरोवरं अनेकदा चर्चेत येत असतात. यातील एक सरोवरावर वैज्ञानिकांनी मोठय़ा प्रमाणात संशोधन केले आहे. कारण या सरोवराच्या पाण्याचा रंग गुलाबी आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनाऱयावर हिलियर सरोवर असून त्यातील पाण्याचा रंग गुलाबी आहे. 2015 मध्ये एक्स्ट्रीम मायक्रोबायोम प्रोजेक्टकडून संशोधकांची एक टीम येथे पाठविण्यात आली होती. या टीमने तलावाच्या रंगावर अध्ययन केले आहे.

या सरोवराच्या गुलाबी रंगामागे परग्रहवासीय असल्याचे लोकांचे मानणे होते. तर काही काळानंतर तलावात मीठाचे प्रमाण अधिक असल्याने हा रंग मिळाला असावा असेही मानले जाऊ लागले. संशोधकांनी या रंगामागील मूळ कारण जाणून घेण्यासाठी पाण्याचे नमुने मिळविले आणि त्याची डीएनए चाचणी केली आहे. या चाचणीतून दंग करणारे निष्कर्ष समोर आले आहेत.

संशोधकांना मीठावर आढळून येणाऱया बॅक्टेरियाच्या 10 प्रजाती या पाण्यात आढळून आल्या आहेत. तसेच डूनालियला नावाचा एलगी मिळाला असून त्याचा रंग गुलाबी आणि लाल असतो. यामुळे पाण्याचा रंग गुलाबी झाला असू शकतो. परंतु संशोधकांना याहून चकित करणारी गोष्ट पाण्याच्या नमुन्यात आढळून आली आहे. त्यांना सॅलिनीबॅक्टर रबर नावाचा बॅक्टेरिया अत्यंत अधिक प्रमाणात आढळून आला आहे. या बॅक्टेरियाच्या रंगामुळेच सरोवराला हा रंग प्राप्त झाल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे. या सरोवरात पोहणे अत्यंत सुरक्षित असून मीठाचे प्रमाण अधिक असल्याने पोहणे सोपे देखील आहे.

Related Stories

बॅलेन्स टेस्टने कळणार तुमचे आर्युमान

Amit Kulkarni

सदैव घरातून काम करण्याची अनुमती

Patil_p

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात 151 पदार्थांचा अन्नकोट

Tousif Mujawar

चिमुकल्यांना गोष्टी सांगतोय अल्फा मिनी

Patil_p

बॉम्बवर्षावादरम्यान सैनिक जोडप्याचा विवाह

Patil_p

गुहेत मिळाला 2200 वर्षे जुना खजिना

Patil_p