Tarun Bharat

पिसोरा शिकार प्रकरणी ठोसेघर येथील दोन जण अटकेत

२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

Advertisements

कास प्रतिनिधी

ठोसेघर ता. सातारा येथील दोघे जण पिसोरा या वन्यप्राण्याच्या शिकार प्रकरणी वनविभागाच्या जाळयात अडकले असुन त्यांच्या राहत्या घरातुन पातेल्यात शिजवलेले मांस जप्त करण्यात आले असुन आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना २ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे

बुधवारी मिळालेल्या माहीतीनुसार सातारा तालुका वनविभागाचे वन क्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांच्या पथकाने मध्यरात्री ठोसेघर येथील आरोपी बाबुराव रामचंद्र जाधव व रघुनाथ विठ्ठल चव्हाण यांच्या राहत्या घरी भेट देऊन तपास केला असता जर्मनच्या पातेल्यात पिसोरा वन्यप्राण्याचे मांस शिजवल्याचे आढळुन आले व वनक्षेत्रात जाऊन शिकार केल्याची त्यांनी कबुलीही दिली असुन त्यांना वन्यजीव व वनआधिनियम या कलमां अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना २ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
सातारा उपवनसंरक्षक महादेव मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण वनपाल अरूण सोळंखी वनरक्षक अशोक मालप राजकुमार मोसलगी साधना राठोड महेश सोनावले श्रीकांत दुर्गै अश्विनी नरळे शेखर शिरतोडे आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता

Related Stories

देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; केली ‘ही’ मागणी

Tousif Mujawar

”मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”

Archana Banage

हाथरस येथे पायी निघालेल्या राहुल गांधींना यूपी पोलिसांकडून अटक

Tousif Mujawar

शाहू महाराज फक्त महाराष्ट्राचे नाहीत, तर संपूर्ण देशाचे आहेत – संभाजीराजे छत्रपती

Archana Banage

परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण

datta jadhav

कोल्हापूर नाक्यावर 460 कोटींचा सहापदरी उड्डाणपूल होणार

Patil_p
error: Content is protected !!