फर्मागुडी-फोंडा येथे प्लंबिंग केंद्राचा पायाभरणी सोहळा
प्रतिनिधी /फोंडा
नियोजनबद्ध प्लंबिंग ही एक कला आहे. कोणत्याही उद्योग व गृहनिर्माणासाठी कौशल्यपुर्ण प्लंबिंग महत्वाचे आहे. फर्मागुडी येथे होऊ घातलेला हा प्रकल्प प्लंबिंग क्षेत्राला प्रतिष्ठा देण्यात महत्वाची भूमिका बजावेल. या उपक्रमातून युवा प्लंबरना कौशल्य आणि योग्य प्रशिक्षण देण्याचे काम करेल असे प्रतिपादन क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
फर्मागुडी फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात सीओआयपीपी या भारतीय प्लंबिंग असोसिएशनच्या प्लंबिंग केंदाच्या पायाभरणी सोहळयात ते पमुख पाहूणे बोलत होते. यावेळी बोलताना मंत्री गोविंद गावडे म्हणाले की प्लंबिंग हे मौल्यवान क्षेत्र असूनही अनेकांचे या क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले आहे. प्लंबिंग नोकरीकडे कमी दर्जाची नोकरी म्हणून पाहिले जाते आणि कमी महत्वाचे काम मानले जाते. परंतू प्रत्यक्षात प्लंबिंग ही प्रत्येक क्षेत्राची महत्वाची बाब आहे,s सीओआआयपीचे प्लंबिंग क्षेत्रातील संशोधन राज्यभरातील लोकांना लाभदायक ठरेल असे गावडे म्हणाले.
यावेळी बोलताना सहस्त्रबुद्धे म्हणाले की प्लंबिंग हे मानवी आरोग्य स्वच्छता आणि पर्यावरणाशी थेट जोडलेले शास्त्र आहे. निरोगी एमारतीसाठी योग्य प्लंबिंग पद्धतीच्या महत्वाबद्दल जागरूकता वाढविण्याबरोबर शिक्षणाच्या या क्षेत्रात असलेली शिकण्याची अंतर देखील भरून काढेल. दरवर्षी त्यांच्या संशोधनाचे किमान दोन पेटंट दाखल करण्याचे या केंद्राचे उद्दिष्टय़ असल्याचे त्यांनी नमूद केले.
आयपीएचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरमित सिंग अरोरा म्हणाले राष्ट्र निर्माण करण्यासाठी आयपीए च्या सर्वात मोठय़ा उपक्रमापैकी एक आहे. सीओआयपीपी हा भारतीय प्लंबिंग असोसिएशन भारतातील प्लंबिंग व्यवसायिकांची सर्वोच्च संस्था आणि गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त उपक्रम आहे. ही अत्याधुनिक 625 चौ. मिटर क्षेत्रफळ असलेली प्लंबेंग प्रयोगशाळा कार्यरत असेल आणि प्लंबिंग आणि बिल्डिंग बंधुत्वासाठी एक स्टॉप लर्निंग, ज्ञान, आणि सराव हब असेल. प्लंबिंग प्रयोगशाळा प्रत्येक आधुनिक इमारतीसाठी अद्ययावत प्लंबिंग उपकरणे आणि फिटींग्ज प्रदर्शित करेल, कार्यालय निवासी, हॉटेल्स, रूग्णालये आणि संस्था कोडल आधारीत प्लंबिंग पद्धती आणि प्रयोगशाळा राज्यासाठी मानाचा तुरा ठरेल. प्रयोगशाळा इमारत आणि संबंधित उद्योग बांधवांसाठी आवश्यक असणारे ठिकाण असेल जेथे प्लंबिंगचे व्यवहारिक ज्ञान मिळवण्यासाठी प्लंबिंग महत्वाची भूमिका बजावते असे ते म्हणाले.