Plastic waste eradication campaign in Sawantwadi city
उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सावंतवाडी शहरामधील विविध भागात तृतीय वर्षाचे सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाने मिळून शहरातील प्लॅस्टिक कचरा गोळा करून प्लॅस्टिक निर्मूलनाचा संदेश नागरिकांना दिला. याप्रसंगी सावंतवाडी नगरपरिषदेचे उद्यान पर्यवेक्षक श्री.गजानन परब व आरोग्य विभाग प्रमुख सौ. रसिका नाडकर्णी मॅडम यांनी सर्वांना हरित शपथ दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून सावंतवाडी शहरातील शिल्पग्राम,मुख्य बाजारपेठ, वाघ पाणंद, मच्छी मार्केट व तलाव परिसर इत्यादी विविध ठिकाणी जाऊन मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक गोळा केले.
सदर मोहिमेमध्ये महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.संदीप गुरव, डॉ. गिरीश उईके व प्रा. हर्षवर्धन वाघ, सहाय्यक कुलसचिव श्री. विलास यादव व वाहन चालक श्री.राजू पावसकर या सर्वांनी विद्यार्थ्यां सोबत सक्रिय सहभाग घेतला. मा.सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रदीप हळदवणेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या अनोख्या अश्या घन कचरा प्रक्रिया केंद्रास भेट देऊन कचरा विघटन व प्रक्रिया याविषयीची माहिती घेतली व पाहणी केली. याप्रसंगी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री.जयंत जावडेकर साहेब, पर्यवेक्षक श्री. दीपक म्हापसेकर, कर्मचारी श्री. निवेद कांबळी, श्री. अक्षय पंडित, श्री. दत्तात्रय सावंत, श्री.गणेश गावकर व सर्व सफाई कामगार यांनी मोलाचे सहकार्य केले. या मोहिमेच्या माध्यमातून प्लॅस्टिक कचरा इतरत्र टाकू न देण्याचा संदेश देऊन जनजागृती करण्यात आली. या स्तुत्य उपक्रमाबद्दल सावंतवाडी येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सावंतवाडी / प्रतिनिधी