Tarun Bharat

बीडीबीएतर्फे खेळाडू, प्रशिक्षकांचा सत्कार

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे बॅडमिंटन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रशिक्षक व खेळाडुंचा खास सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बॅडमिंटनपटू व उद्योजक शिरीष गोगटे होते.

महाबळेश्वर नगर येथील बीडीबीएच्या बॅडमिंटन सभागृहात आयोजित या सत्कार प्रसंगी संघटनेचे सचिव अशोक पाटील आनंद हावन्नावर, जी. एस. मंथेरो, मनोज पाटील, महादेव माळगी, अभय हरदी आदी उपस्थित होते. यावेळी बॅडमिंटन क्षेत्रात एनआयएस प्रशिक्षक म्हणून उत्तीर्ण झालेल्या संघटनेचे प्रमुख प्रशिक्षक भूषण अन्वेकर, सहाय्यक प्रशिक्षक लेव्हल वन प्रमाणपत्र पटकाविलेल्या वफा अन्वारी, तनिष्का कोरीशेट्टीने आपल्या गटात राज्य व राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. अथर्व हुबळीकर याने राज्यस्तरीय शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. या सर्व कामगिरीची दखल घेऊन वरील प्रशिक्षक व खेळाडुंचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बॅडमिंटन खेळाडू, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

तिलारीनजीक धबधब्यामध्ये बुडून बेळगावच्या युवकाचा मृत्यू

Tousif Mujawar

कर्नाटक विकास ग्रामीण बँकेकडून कोरोना निवारणासाठी 50 लाखाचा निधी

Patil_p

टायटनच्या नव्या दालनाचा थाटात शुभारंभ

Omkar B

दुर्गामाता दौड भक्तिभावाने करणार

Amit Kulkarni

सीमावासियांवरील अन्यायाविरोधात लोकसभेत आवाज उठविणार

Amit Kulkarni

फांद्यांच्या विळख्यात अडकले पथदीप

Patil_p