Tarun Bharat

मल्ल सम्राटचे खेळाडू करणार महाराष्ट्र केसरीत सिंधुदुर्गचे नेतृत्व

Players of Malla Samrat will lead Sindhudurg in Kesari, Maharashtra

मल्ल सम्राट प्रतिष्ठान सावंतवाडीचे खेळाडू महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.६५ वी वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कोथरूड पुणे येथे दिनांक १० ते १४ जानेवारी दरम्यान होत आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व मल्ल सम्राट प्रतिष्ठान सावंतवाडीचा पैलवान ललित हरमलकर (महाराष्ट्र केसरी गट ), नागेश सूर्यवंशी (९२ किलो), तेजस सुर्वे (६५ किलो), संकेत माळी (७० किलो), गणेश राऊळ (७९ किलो), बुधाजी हरमलकर (५७ किलो), ७. दशरथ गोंड्यालकर (६१ किलो), चेतन राणे (८ ६ किलो) आणि विघ्नेश बोन्द्रे हे करत आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष योगेश बेळगावकर, किशोर हरमलकर, किरण गोंधळी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना दाजी रेडकर, हर्षद मोर्जे यांचे मार्गदर्शन लाभले.

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

सांगेली प्रभारी सरपंचपदी रमाकांत राऊळ

Anuja Kudatarkar

हुमरमळा महाशिवरात्रोत्सव यावर्षी गाव मर्यादितच

NIKHIL_N

नांगरणी स्पर्धेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

Patil_p

दापोली पं. स.चे पंचायत राज समितीचीकडून मूल्यमापन

Archana Banage

पाकिस्तानकडे लस खरेदीसाठीही नाहीत पैसे

datta jadhav

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या किंमतीत वाढ !

Tousif Mujawar