232 प्रवासी वेटिंगवर, नैर्त्रुत्य रेल्वेचे दुर्लक्षच : प्रवाशांमधून संताप व्यक्त
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सवासाठी गावी परतणाऱया रेल्वे प्रवाशांचे पुरते हाल होत आहेत. वेटिंगवर प्रवाशांचा बेळगावपर्यंतचा प्रवास सुरू आहे. सोमवारी दादर-हुबळी एक्स्प्रेसला 232 प्रवासी वेटिंगवर होते. त्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वेने या मार्गावर उत्सव स्पेशल रेल्वे सुरू केली असती तर प्रवाशांची सोय झाली असती. परंतु नैर्त्रुत्य रेल्वेने पूर्णपणे दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
बेळगाव परिसरातील शेकडो भाविक व्यवसाय-नोकरीसाठी मुंबई-पुणे या महानगरांमध्ये आहेत. गणेशोत्सवाला हे सर्व भाविक गावी परतत असतात. यासाठी प्रथमतः रेल्वेला पसंती देण्यात येते. कमी खर्चात रेल्वेचा सुखकर प्रवास करता येत असल्याने रेल्वेचे बुकिंग केले जाते. मुंबईहून बेळगावला येण्यासाठी हुबळी व चालुक्मय अशा दोन एक्स्प्रेस दररोज धावतात. यापैकी चालुक्मय एक्स्प्रेस तिरुवेनवेल्ली, पुद्दुचेरी व म्हैसूर येथून धावत असल्याने या रेल्वेला कमी बुकिंग मिळते. त्यामुळे बेळगावचे प्रवासी दादर-हुबळी एक्स्प्रेसवर अवलंबून असतात.
मागील दोन वर्षांत गणेशोत्सव साजरा करता आला नसल्याने यावषी गावी जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी केली जात होती. परंतु रेल्वेचे बुकिंग महिनाभरापूर्वीच फुल्ल झाल्याने नागरिकांना तात्काळ तिकिटांवर अवलंबून रहावे लागले. खासगी टॅव्हल्स चालकांनी वाढविलेले दर, परिवहन मंडळाच्या बसेसची अनियमितता यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
हुबळी-232 तर चालुक्य 95 वेटिंग
दादर-हुबळी एक्स्प्रेसला सोमवारी 232 वेटिंग होते. तर दादर-पुद्दुचेरी एक्स्प्रेसला स्लीपर क्लाससाठी 95 वेटिंग लागले होते. हे वेटिंग पाहता या मार्गावर उत्सव स्पेशल रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांची तर सोय झालीच असती त्याचबरोबर रेल्वेलाही महसूल मिळाला असता. परंतु नैर्त्रुत्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.