Tarun Bharat

दाऊदच्या हस्तकांकडून मोदींच्या हत्येचा कट; मुंबई पोलिसांना मिळाला ऑडिओ मेसेज

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा ऑडिओ मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर आला आहे. या ऑडिओ मेसेजनंतर पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबरला मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण क्रमांकावर सात ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज आले होते. त्यानंतर पुन्हा 21 नोव्हेंबरला 12 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज वाहतूक नियंत्रण कक्षाला प्राप्त झाले. यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने दावा केला होता की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट आखत आहेत. तसेच, हे हस्तक देशाला बर्बाद करण्याच्या प्रयत्नात आहेत.

अधिक वाचा : धानोरीत अफीम बोंडाचा सात किलो चुरा जप्त

या धक्कादायक ऑडिओ मेसेजनंतर पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला. या प्रकरणाच्या तपासाअंती असं आढळून आलं की, मेसेज करणाऱ्या व्यक्ती पूर्वी एका हिऱ्यांच्या कंपनीत दागिने डिझाईन करत होता. परंतु, मानसिक आजारामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. तो सध्या वर्षभरापासून बेरोजगार आहे. या व्यक्तीवर पोलिसांनी कोणती कारवाई केली? यासंदर्भात अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Stories

दिल्ली मद्य घोटाळय़ात खासदारपुत्राला अटक

Patil_p

मुलांच्या लसीची तयारी : लस चाचणीचे निकाल सप्टेंबरपर्यंत येणार

Tousif Mujawar

सौंदत्ती डोंगरावर महाराष्ट्र ST बसेसची सुरक्षा वाढवली

Archana Banage

उत्तराखंडात मागील 24 तासात 171 नवे कोरोना रुग्ण; 8 मृत्यू

Tousif Mujawar

अभिनेता रितेश देशमुखकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामाचे भरभरून कौतुक

prashant_c

नौसेनेचे ग्लायडर कोसळले; दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

datta jadhav