Tarun Bharat

जुन्या धारवाड रोडवरील धोकादायक खड्डा बुजवा

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

शहापूर-खडेबाजार येथून जुन्या धारवाड रोडकडे जाणाऱया महात्मा फुले रोडचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र धारवाड रोडच्या प्रवेशद्वारावरच एक मोठा खड्डा पडला असून त्याठिकाणी अपघात घडण्याची शक्मयता निर्माण झाली आहे.

 धारवाड रोडचे रुंदीकरण योग्यप्रकारे झाले नाही. तसेच त्याचे डांबरीकरणही करण्यात आले नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. या खड्डय़ामुळे त्याठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे.

काही रस्त्यांचे डांबरीकरण आणि रुंदीकरण करण्यात येत आहे. तर काही रस्ते जैसे थे परिस्थितीत आहेत. रस्त्यांवरून वाहन चालविणे कठीण झाले आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत कोणतीच कामे योग्यप्रकारे होत नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. जुन्या धारवाड रोडवर गेल्या अनेक महिन्यांपासून हा खड्डा तसाच आहे. त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविणे अवघड जात आहे.

या खड्डय़ामध्ये पाणी आहे. त्या खड्डय़ाच्या बाजूला आता बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मात्र त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे वाहनचालकांतून व परिसरातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तातडीने हा खड्डा बुजवावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

रविवारपेठ खुली पण गर्दीमुळे खावा लागला प्रसाद

Patil_p

नर्सिंग विद्यार्थ्यांना विद्याश्री वेतन द्या

Omkar B

बाप्पा चालले आपुल्या गावाला!

Amit Kulkarni

मंगाईनगर-वडगाव परिसरात डेंग्यूचे संशयित रुग्ण

Amit Kulkarni

बेळगाव महापालिका महापौरपद सामान्यांसाठी

Amit Kulkarni

मिरज माहेर मंडळातर्फे तिळगूळ समारंभ

Omkar B
error: Content is protected !!