Tarun Bharat

PM मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक; बिटकॉईन संदर्भात ट्विट करत उडवली खळबळ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट काही काळासाठी हॅक करण्यात आले होते. अकाऊंट हॅक केल्यानंतर केंद्राने बिटकॉईनला मान्यता दिल्याचे ट्विट त्यावरुन करण्यात आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पंतप्रधान कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

मध्यरात्री 2 वाजून 11 मिनिटांनी पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले. हॅक केल्यानंतर ‘भारताने बिटकॉईनला कायदेशीर मान्यता दिली आहे. तसेच भारताने 500 बिटकॉईन खरेदी केले असून देशातील लोकांना वाटत आहे,’ असे ट्विट या अकाऊंटवरुन करण्यात आले होते. पंतप्रधान कार्यालयाने हा मुद्दा ट्विटरकडे उपस्थित केला असता अकाऊंट त्वरित रिस्टोअर आणि सुरक्षित करण्यात आले. दरम्यान, हॅक झाल्यानंतर काही मिनिटांत शेअर केलेल्या ट्विटकडे दुर्लक्ष करा, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

Related Stories

दोष नव्हे दिशा देणारे सरकार निवडा!

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये बस दुर्घटना, 12 ठार

Patil_p

ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली; याचिकाकर्त्याला फटकारले

Archana Banage

मावळचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

datta jadhav

काश्मीरमधील ‘पेन्सिल व्हिलेज’

Patil_p

भाजपमध्ये मोठी फूट पडेल म्हणून आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित – नाना पटोले

Archana Banage