ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
इटली आणि ब्रिटनच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी आज रोममध्ये दाखल झाले आहेत. ते रोममध्ये G-20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार असून, त्यामध्ये कोरोना, हवामान बदल, जागतिक आर्थिक सुधारणा यांसारख्या मुद्यांवर नेत्यांशी संवाद साधतील.
मोदी 29-31 ऑक्टोबर दरम्यान रोम आणि व्हॅटिकन सिटीला भेट देणार आहेत. त्यानंतर ते ब्रिटनला जाणार आहेत. तेथे इटालियन पंतप्रधान मारियो द्राघी यांची भेट घेणार आहेत. ब्रिटनमधील ग्लासगो येथे पंतप्रधान मोदी कार्बन स्पेसच्या न्याय्य वितरणासह हवामान बदलाच्या मुद्यांवर सर्वसमावेशकपणे लक्ष देण्याची गरज यावर बोलणार आहेत.