ऑनलाईन टीम / मुंबई :
लॉकडाऊन काळात PM Cares Fund च्या नावे बनावट वेबसाईट तयार करून पैसे लुटणाऱ्या 78 जणांवर राज्यातील विविध शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांच्या उपचाराकरिता देणगी देणाऱ्यांसाठी भारत सरकारने pmcares फंडाची अधिकृत वेबसाईट तयार केली आहे. मात्र, पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये pmcares फंडाच्या नावाखाली pmcaress@sbi, pmcares@hdfc, pmcarefund@sbi, pm.care@sbi, pmcares@pnb, pmcares@upi यासारख्या बनावट वेबसाईट तयार करून पैसे लुबाडण्याचे प्रकार सुरू असल्याचे सायबर पोलिसांच्या लक्षात आले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी राज्यातील विविध ठिकाणी 78 गुन्हे दाखल करत त्यांच्यावर कारवाई केली.
सायबर पोलिसांनी अशा प्रकारच्या चुकीच्या लिंकपासून सावध राहण्याचा सल्ला जनतेला दिला आहे. तसेच ज्यांना भारत सरकारच्या pmcares फंड करता देणगी द्यायची आहे त्यांनी pmcares@sbi या अधिकृत लिंकचाच वापर करावा, अशी विनंती सायबर सेलने केली आहे.