Raju Shetti : पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वारंवार सांगूनही माझ्या खात्यावर पैसे यायचे थांबत नाहीत आणि सर्वसामान्य शेतक-यांनी अनेक हेलपाटे घातले तरीसुध्दा त्यांच्या खात्यावर पैसे येत नाहीत. काय गौडबंगाल आहे कळत नाही अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. आज त्यांनी शिरोळ येथील तहसील कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांनी तहसिलदार सौ. अपर्णा मोरे धुमाळ यांना भेटून या योजनेतून स्वत:ला अपात्र करणेबाबत सुचविले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिला जाणारा दोन हजार रुपयांचा अकरावा हप्ता ३१ मे रोजी माझ्या खात्यात जमा झाला. मी लोकसभेचा माजी सदस्य असल्याने या योजनेसाठी केंद्र सरकारच्या धोरणानुसार अपात्र असूनही हा सन्मान निधी माझ्या खात्यावर जमा होत आहे. याआधी मी स्वत: ६ हप्ते जमा झालेनंतर १२ हजार रूपयाचा धनादेश शासनास परत करून या योजनेतून मला अपात्र करणेबाबत पत्र दिले होते. तरीही आज अखेर ११ हप्ते नियमीत जमा झालेले आहेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आज पुन्हा शिरोळ तहसिलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना भेटून या योजनेतून अपात्र करणेबाबत सुचविले. मी वारंवार सांगूनही माझ्या खात्यावर पैसे यायचे थांबत नाहीत आणि सर्वसामान्य शेतक-यांनी अनेक हेलपाटे घातले तरीसुध्दा त्यांचे पैसे येत नाहीत , काय गौडबंगाल आहे कळत नाही असेही ते म्हणाले.


previous post