Tarun Bharat

तो कोणता पंजा होता, जो 1 रुपयातील 85 पैसे घासून घेत होता

ऑनलाईन टीम / बर्लिन :

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी बर्लिनमध्ये भारतीयांना संबोधित केलं. भारताच्या विकासाला गती देण्यापासून लोकल फॉर वोकल, स्टार्टअप, डीबीटीसह कलम 370 हटवण्याच्या संदर्भात केंद्र सरकारने केलेल्या कार्यांचा पाढा त्यांनी वाचला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. आता कोणत्याही पंतप्रधानाला म्हणावे लागणार नाही की, एक रुपयांपैकी 15 पैसेच जनतेपर्यंत पोहोचतात. तो कोणता पंजा होता जो एक रुपयांमधील घासून घासून 85 पैसे काढून घेत होता, असा खोचक टोला मोदींनी काँग्रेसला लगावला.

मोदी म्हणाले, भारतातील मतदारांनी 30 वर्षांनंतर 2014 मध्ये पूर्ण बहुमताचे सरकार निवडून दिले. एक बटण दाबून भारताने तीन दशकांची राजकीय अस्थिरता संपवली आहे. 21 व्या शतकातील काळ भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज भारत दृढनिश्चयाने पुढे जात आहे. भारत नवीन वाटांवर चालत आहे. गेल्या आठ वर्षांत भारत प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. राहणीमान, जीवनमान, रोजगार सुलभता, शिक्षणाचा दर्जा, व्यवसायातील सुलभता, प्रवासाची गुणवत्ता, उत्पादनांची गुणवत्ता या सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

जगातील रिअल टाइम डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा वाटा 40 टक्क्यांवरून अधिक आहे. भारत सरकार शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवत आहे. त्यासाठी डिजिटलायझेशनचा वापर केला जात आहे. आता कोणत्याही पंतप्रधानाला म्हणावे लागणार नाही की, एक रुपयांपैकी 15 पैसेच जनतेपर्यंत पोहोचतात. तसेच तो कोणता पंजा होता जो एक रुपयांमधील घासून घासून 85 पैसे काढून घेत होता, असा टोलाही मोदींनी काँग्रेसला लगावला.

Related Stories

द्वेष भावनेतून घेतलेला निर्णय…याचा आम्ही निषेध करतो- प्रकाश आंबेडकर

Abhijeet Khandekar

साकीनाका बलात्कार प्रकरणी दोन दिवसांचं अधिवेशन बोलवा, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश

Archana Banage

अखेर फारुख अब्दुल्ला यांची नजरकैद्येतून सुटका

tarunbharat

सियाचीनमध्ये 38 वर्षांनी मिळाले हुतात्म्याचे पार्थिव

Patil_p

बाधितांच्या संख्येत वाढ

datta jadhav

दिल्लीत जैशचे 2 दहशतवादी जेरबंद

Patil_p