ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज सकाळी गांधीनगर रेल्वेस्थानकावरुन ‘वंदे भारत एक्सप्रेसला’ हिरवा झेंडा दाखवला.नयामुळे देशाला आता तिसरी वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Train) मिळाली आहे. ही ट्रेन मुंबई ते गुजकरातमधील गांधीनगर अशी चालणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गांधीनगर रेल्वेस्थानकावरुन ‘वंदे भारत एक्सप्रेसला’ हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेने ५ तास २५ मिनिटात गांधीनगरमधून मुंबईला पोहाचू शकतो. पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या गांधीनगरपासून कालापूरपर्यंत प्रवास करणार असल्याचे बोलले जात आहे. यासह मोदी अहमदाबाद मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत.
ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुविधा पाहता अनेक बदल करण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये एकूण १ हजार १२८ प्रवासी बसण्याची क्षमता आहे. आज तिसरी वंदे भारत ट्रेन गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यानही धावणार आहे. पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली-वाराणसी मार्गावर धावली.
ही ट्रेन अवघ्या ५२ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठते.ही ट्रेन पूर्णपणे एसीअसणार आहे. याशिवाय ट्रेनमध्ये जागोजागी चार्जिंग पॉईंट, स्लाईडिंग विंडो, व्यक्तिगत वाचनासाठी दिवा, अटेंडेंट कॉल बटन, स्वयंचलित दरवाजे, बायो-टॉयलेट, सीसीटीव्ही, या ट्रेनमध्ये असणार आहेत. ट्रेनमध्ये स्लाइडिंग फूटस्टेप्ससह स्वयंचलित प्लग दरवाजे तसेच टच फ्री स्लाइडिंग दरवाजे बसवले आहेत.