Tarun Bharat

PM मोदींच्या हस्ते 5G Testbed लाँच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज 5G टेस्टबेडचा शुभारंभ झाला. (pm modi launch 5g testbed) यावेळी दूरसंचार क्षेत्रातील गंभीर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेनं हे महत्त्वाचे पाऊल आहे. देशासाठी ही अभिमानाची बाब असून, देशातल्या ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. (pm modi launch 5g testbed)

Advertisements

ट्रायचा (दूरसंचार नियामक प्राधिकरण) आज रौप्य महोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला होता. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान मोदींनी 5G टेस्टबेड लॉन्च करून देशाला समर्पित केला. यावेळी ते म्हणाले, मला स्वदेशनिर्मित 5G टेस्टबेड देशाला समर्पित करण्याची संधी मिळाली. दूरसंचार क्षेत्रातील गंभीर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेनं हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. देशातील खेडय़ापाडय़ात 5G तंत्रज्ञान पोहोचवण्यात ती मोठी भूमिका बजावेल. 5G टेक्नॉलॉजी देशाच्या कारभारातही सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. यामुळे कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक या प्रत्येक क्षेत्रातील वाढीला चालना मिळेल. त्यामुळे सुविधाही वाढणार असून रोजगाराच्या अनेक संधीही निर्माण होणार आहेत.

दरम्यान, येत्या 15 वर्षांत 5G मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 450 मिलियन डॉलर्सचा फायदा होईल, असा अंदाजही मोदींनी व्यक्त केला. आपण 2G वरून 6G वर गेलो असून, हे काम पूर्ण गतीने आणि पारदर्शकतेने होत आहे, असेही मोदी म्हणाले.

Related Stories

मुंबई हल्ल्याला काँगेसचे प्रत्युत्तर दुबळे

Patil_p

अमेरिकेतून भारतात येणार 100 व्हेंटिलेटर

datta jadhav

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी ठोकणार तळ

Patil_p

त्रालमध्ये दहशतवाद्यांचे 5 मदतकर्ते अटकेत

datta jadhav

जानेवारीत जीएसटी संकलन 1.1 लाख कोटी रुपयांवर

Patil_p

सोशल डिस्टन्सिंगसाठी आता पेडंट

tarunbharat
error: Content is protected !!