पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची आज मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आहेत. मुंबईत त्यांनी आज 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या पायाभरणीचा शुभारंभ केला. आज मुंबईतील जनसभेला संबोधित करताना त्यांनी “डबल इंजिन सरकार” (Double Engene Government) गरीबातील गरीब लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वचनबद्ध आहे. विमानतळांच्या धर्तीवर रेल्वे स्थानकांचाही विकास केला जात असून सर्वात जुने रेल्वे स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसचा पुनर्विकास केला जात आहे. तसेच हे सरकार मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटीसाठी आग्रही असल्याचेही ते म्हणाले. वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानावर आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन नवीन मुंबई मेट्रो लाईन आणि रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि PM स्वानिधी योजनेसह विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले.
यावेळी जनसमुदायाला संबोधीत करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “जग आर्थिक संकटात सापडले असताना, भारत नागरिकांना अनुदान देत आहे. “डबल इंजिन सरकार“ गरीबातील गरीब लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वचनबद्ध आहे. विमानतळाच्या धर्तीवर देशातील रेल्वे स्थानकांचाही विकास केला जात असून सीएसएमटीचा पुनर्विकास केला जातोय. हे सरकार मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटीसाठी जोर देत आहे,” असे ते म्हणाले.
आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी मुंबईतील सुमारे 38,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी केली. त्यानंतर त्यांनी अंधेरीतील गुंदवली मेट्रो स्थानकातून मुंबई मेट्रो 2A आणि 7 या दोन मार्गांचे उद्घाटन केले. तसेच शेवटी मेट्रोचा प्रवास करून मेट्रोतील प्रवाशी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.


previous post