Tarun Bharat

पंतप्रधान मोदींचा सूरतमध्ये 2.7 किमीचा रोड शो

Advertisements

सूरत शहरामध्ये 3400 कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ : दोन दिवसांच्या गुजरात दौऱयावर पंतप्रधान

वृत्तसंस्था / सूरत

पंतप्रधान नरेंद मोदींनी स्वतःच्या दोन दिवसीय गुजरात दौऱयाची सुरुवात गुरुवारी सूरतमध्ये 2.7 किलोमीटर लांबीच्या रोड शोने केली आहे. एका उघडय़ा वाहनातून त्यांनी हा रोड शो करत उपस्थित मोठय़ा जनसमुदायाला अभिवादन केले आहे. रोड शोनंतर पंतप्रधान मोदींनी सूरतमध्ये 3400 कोटी रुपयांहून अधिक निधीच्या अनेक विकासकामांचा शुभारंभ केला आणि त्यानंतर एका जाहीर सभेला संबोधित केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी सूरतवासीयांच्या मेहनतीचा उल्लेख करत त्यांचे आभार मानले आहेत.

सूरत हे शहर मेहनती लोकांचा सन्मान करणार आहे. सूरतचे व्यापारी देशातील कोटय़वधी लोकांना रोजगार देत आहेत. सूरत हे शहर एकेकाळी महामारी अन् पूराच्या समस्येने त्रस्त असायचे. सूरत शहराचे ब्रँडिंग करण्यात आल्यास प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक कंपनीचे ब्रँडिंग आपोआप होईल असे येथील व्यापाऱयांना मी सांगितले होते. सूरतच्या लोकांनी हे करून दाखविले आहे. जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱया शहरांमध्ये सूरतचे नाव सामील असल्याने आनंदी असल्याचे मोदी म्हणाले.

मागील 20 वर्षांमध्ये सूरतने उर्वरित शहरांच्या तुलनेत वेगाने प्रगती केली आहे.  ही कामगिरी केवळ लोकांच्या मेहनतीमुळेच शक्य झाली आहे. येथील नव्या ड्रेनेज व्यवस्थेने शहराला नवे जीवनदान दिले आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे शहर स्वच्छ करण्यास मोठी मदत मिळाली असून येथील झोपडपट्टय़ांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात कमी झाले आहे.  झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱया सुमारे 80 हजार गरीबांसाठी घरे बांधण्यात आल्याने त्यांचे राहणीमान सुधारले आहे. तर दुसरीकडे आयुष्मान भारत योजनेमुळे देशभरात आतापर्यंत 4 कोटी गरीब रुग्णांवर मोफत उपचार झाले आहेत. यातील 32 लाखांहून अधिक रुग्ण गुजरातचे असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

सूरत ‘4-पी’चे उदाहरण

या शतकाच्या प्रारंभीच्या दशकांमध्ये जगात 3-पी म्हणजेच पब्लिक-प्रायव्हेट आणि पार्टनरशिपची चर्चा व्हायची. तेव्हा मी सूरत 4-पी चे उदाहरण असल्याचे सांगायचो. 4-पी म्हणजे पीपल, पब्लिक, प्रायव्हेट आणि पार्टनरशिप. हे मॉडेल सूरत शहराला विशेष स्वरुप देते. व्यापार, व्यवसायात लॉजिस्टिक्सचे किती महत्त्व आहे हे सूरतचे लोक चांगल्याप्रकारे ओळखून आहेत. न्यू लॉजिस्टिक्स धोरणामुळे सूरतला मोठा लाभ होणार आहे. मल्टीमॉडेल कनेक्टिव्हीटीसाठी सूरतमध्ये एक मोठय़ा योजनेवर काम सुरू झाले आहे. ड्रीम सिटी प्रकल्प पूर्ण झाल्यावर सूरत जगातील सर्वात सुरक्षित आणि सुविधाजनक डायमंड ट्रेडिंग हब म्हणून विकसित होणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

अहमदाबादमध्ये मेट्रोमार्ग

पंतप्रधान मोदी हे शुक्रवारी वंदेभारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. याच रेल्वेतून पंतप्रधान हे कालुपूर येथे पोहोचणार आहेत. तसेच अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. अहमदाबाद येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर राजकोटमध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या घरांचे लोकार्पण मोदी करणार आहेत.

600 ड्रोन्सद्वारे स्वागत

मोदींच्या दौऱयाला प्रारंभ होण्यापूर्वी आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी 600 स्वदेशी ड्रोन्सद्वारे त्यांचे स्वागत केले. यादरम्यान आकाशात स्टॅच्यू ऑफ युनिटी, वेकलम पीएम मोदी, मॅप ऑफ इंडिया, वंदे गुजरात, आझादी का अमृत महोत्सव आणि नॅशनल गेम्सला ड्रोनद्वारे प्रदर्शित करण्यात आले.

Related Stories

केरळमध्ये डावे सुसाट, काँग्रेस पिछाडीवर

datta jadhav

दिल्लीत रविवारी 6,456 नवीन कोरोना रुग्ण; 262 मृत्यू

Tousif Mujawar

”1 मे नंतर लसीकरण केंद्रांवरुन लोकांना घरी पाठवण्यात आलं तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?”

Archana Banage

विदेशात कोव्हॅक्सिन उत्पादनासाठी प्रयत्न

Patil_p

कोलकाता : कैलास विजयवर्गीय ताब्यात

Patil_p

दिलासा! छत्तीसगडच्या जिंदाल स्टील प्लान्टहून ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ दिल्लीत दाखल

Tousif Mujawar
error: Content is protected !!