ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीतील चर्चेची सूत्रे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांच्याकडे असतील.
सोमवारी देशात 2,483 नवे रुग्ण आढळले होते. कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असून देशात जूनअखेर चौथ्या लाटेचे संकेत मिळत असल्याने केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे, त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.