ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्या वढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडमधील अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. त्यामित्ताने समाजातील बुद्धिजिवी लोकांसोबत संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मी वंशवादाचं प्रतिक आहे मात्र जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान मोदीही (Pm Narendra Modi) संपवू शकत नाहीत,असं खळबळजनक विधान त्यांनी केलं आहे. मुंडे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. इतकं बोलून पंकजा काही वेळ थांबल्या व म्हणाल्या की, मात्र मी देखील वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कोणी संपवू शकणार नाही. स्वत: मोदी सुद्धा मला संपवू शकणार नाहीत, पण, जर तुमच्या मनात मी राज्य केलं असेल तर. तुमच्यामुळं जर मी काही चांगलं करु शकले तर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला राजकारणात स्वच्छता आणायची आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
राजकारणात आपल्याला वेगळेपण आणायचं आहे. आगामी काळात राजकारणात बदल करावा लागणार आहे. राजकारणामध्ये लोकहिताचे निर्णय होतात. परंतु अलिकडे राजकारण हे करमणुकीचे साधन होत आहे. असं मुंडे म्हणाल्या. यापूर्वी देखील पंकजा मुंडे यांनी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. परंतु त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला डावलण्यात येत असल्याची राजकीय वर्तुळात रंगत आहे.