Tarun Bharat

मळवली पाटण येथील अनधिकृत बांधकामांवर PMDRA चा हातोडा

Advertisements

लोणावळा : मळवली पाटण भागात अनधिकृतपणे टोलेजंग इमारती बांधून नैसर्गिक ओढ्यानाल्यांचे प्रवाह अरुंद करणे, प्रवाह बदलणे असे प्रकार करणार्‍या बांधकामांवर आज PMRDA ने कारवाई करत संबंधित बांधकामे जमिनदोस्त केली.

मळवली पाटण भागातील नैसर्गिक ओढे-नाले अडविल्यामुळे मागील वषी या भागात मोठय़ा प्रमाणात पूर आला होता. मळवली भागातील हॅबेटेड येथील शेकडो घरे तसेच परिसरातील बंगले पाण्याखाली गेले होते. नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते तर अनेक नागरिकांना घरातून रेस्क्यू करत बाहेर काढण्यात आले होते. यानंतर स्थानिक नागरिक, एकविरा कृती समिती, शिवभक्त विजय तिकोणे यांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर मावळचे आमदार सुनिल शेळके, तहसीलदार, प्रांत यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करत अनधिकृत बांधकामे काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. या घटनेला एक वर्ष झाले तरी कारवाई होत नसल्याने एकविरा कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच विजय तिकोणे यांनी मागील पंधरवडय़ात या विषयावर आवाज उठवत भर पाण्यात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. यानंतर आज पीएमआरडीएने जेसीबी, पोकलॅन, ब्रेकर अशी यंत्रे पाठवत बांधकामे जमिनदोस्त केली.

Related Stories

पीएम केअरच्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची चौकशी व्हावी – जयंत पाटील

Abhijeet Shinde

राज्यातील सर्व वसतिगृहे आठ दिवसात सुरू होतील : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

Sumit Tambekar

मनसेचं शक्तिप्रदर्शन; आता कसं वाटतंय…; बॅनरबाजीतून सेनेवर टीकास्त्र

Abhijeet Khandekar

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 95.30 टक्के ; यावर्षीही मुलींचीच बाजी

Rohan_P

“केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात बळी गेलेल्यांपैकी मी एक”: प्रताप सरनाईक

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री ठाकरे मुख्य न्यायमूर्तींच्या भेटीला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!