Tarun Bharat

‘पोको’ एक्स 5 स्मार्टफोन भारतात सादर

48 एमपी कॅमेऱ्यासह अन्य सुविधा स्मार्टफोनसोबत मिळणार

प्रतिनिधी/ नवी दिल्ली

स्मार्टफोन ब्रँड पोको यांनी आपला मध्यम श्रेणीचा पोको एक्स 5 हा 5 जी स्मार्टफोन सादर केला आहे. याची सुरुवातीची किमत ही 19 हजार रुपये राहणार असल्याची माहिती आहे. यामध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा व 120 एचझेड सुपर अमोलेड डिस्प्ले आदी सुविधा असणार असल्याची माहिती आहे.

सदरचा स्मार्टफोन हा 5 जी ब्रँडला सपोर्ट करणार असून रिलायन्स जिओ व एअरटेल या दोन्ही टेलिकॉम ऑपरेटरद्वारे ऑफर केलेल्या 5 जी सेवांचा वापर यावर करता येईल. हा स्मार्टफोन सुपरनोव्हा ग्रीन, जॅग्वार ब्लॅक व वाइल्डकॅट ब्लू आदी रंगामध्ये उपलब्ध होणार असल्याचेही सांगितले आहे.

किंमत

कंपनीने पोको एक्स5 हा 5जी स्वरुपामध्ये दोन प्रकारात भारतीय बाजारात दाखल होणार आहे. त्याच्या किमती या 6 जीबी रॅम व 128 जीबी रॅम यामध्ये हा फोन 18,999 रुपयांना असेल.

पोको एक्स 5 बाबत…

प्रोसेसर : पोको एक्स5 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 एसओसी प्रोसेसर

स्टोरेज व रॅम : हॅण्डसेट 6 जीबी व 8 जीबी एलपीडीडीआर4 एक्स रॅम

तंत्रज्ञान : 5 जी व्हर्च्युअल रॅम तंत्रज्ञानामुळे सुसज्ज

डिस्प्ले : 6.67 इंचाचा फुल्ल एचडी डिस्प्ले असेल

कॅमेरा व बॅटरी : फोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप व 33 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार

Related Stories

सॅमसंग गॅलक्सी एस 22 चे उत्पादन वाढवणार

Patil_p

मोबाईल फोन्सचीनिर्यात तीन पटीने वाढली

Patil_p

एमआय 10 स्मार्टफोन 8 ‘मे’ला बाजारात

Patil_p

मोटो जी 42 भारतात लाँच

Patil_p

अॅपलचा आयफोन 14, 14 प्लस झाला लाँच

Amit Kulkarni

रियलमीचे स्मार्टवॉच-नॉइसचे एअर बड्स बाजारात दाखल

Omkar B