Tarun Bharat

कविवर्य रामाणी यांची कविता लौकिक अनुभवातून

अरूणा ढेरे यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी /पणजी

कविवर्य शंकर रामाणी यांची कविता लौकिक अनुभवातून घडलेली कविता आहे. ती रूढार्थाने आध्यात्मकि नाही.अनुभव शब्दात संक्रमाणित करण्यात ते यशस्वी झाले असे स्पष्ट करून प्रथितयश कवयित्री तथा समीक्षक अरुणा ढेरे यांनी सांगितले की,कविता लेखन रामणींनी व्रतासारखे केले.उपहास, नकार, वडिलांचा संताप वाटय़ाला आला तरी त्यांनी कविता सोडली नाही. कवितेमुळे त्यांच्या जगण्याला अर्थ आला.कविता हा त्यांचा एकमेव आधार होता.

कविवर्य शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी निमित्त, साहित्य अकादमी, कला संस्कृती संचालनालय व इतर संस्था?च्या सहयोगाने संस्कृती भवन मधील सभागृहात”शंकर रामाणीः व्यक्ती आणि कार्य” या परिसंवादाचे उदघाटन केल्यानंतर अरुणा ढेरे उदघाटक यानात्याने बोलत होते.व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून साहित्य अकादमीच्या कोकणी सल्लागार मंडळाचे निमंत्रक डॉ. भूषण भावे ,साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबुवने व कला संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप उपस्थित होते.

अरुणा ढेरे म्हणाल्या, पुष्कळवेळा वाचकांना रामाणींच्या दुर्बोधतेचा सामना करावा लागतो मात्र रामणींच्या कवितेत नेमकेपणा आहे. त्यांनी वेदनांची रूपमाया कवितेत आणली. त्यांचे भावविश्व प्रगाढ होते.त्यांच्या एकाकीपणाने लौकिकाला दूर लोटले.

डॉ. भूषण भावे यांनी, रामणींच्या कवितेत गुढता,अनाकलनियता वारंवार जाणवते याकडे लक्षवेधून ते म्हणाले, त्यांच्या कवितेचे,प्रेम, निसर्ग आणि जीवन असे टप्प? रूढार्थाने म्हणता येणार नाहीत. त्यांनी निराशावादी उदासीन कविताही चांगल्या पद्धतीने लिहिल्या आहेत. त्यांच्या कवितांमध्ये प्रकाशाचे इतके संदर्भ असतांना त्यांना काळोखाचे पुजारी म्हणणे कितपत बरोबर आहे असा प्रश्न भावे यांनी उपस्थित केला. त्यांची कोंकणीतील बहुंशी कविता मुक्तछंदातील तर मराठीतील छंदबद्ध

आहे. शब्दांचे तर ते स्वामी होते.सोळाव्या शतकातील भाषेचे अंश त्यांच्या कवितांत आढळतात.त्यांच्या मराठी आणि कोकणी कवितेचा तुलनात्मक अभ्यास गरजेचा आहे, असे डॉ. भावे यांनी सांगितले. कृष्णा भावे यांनी प्रास्ताविक केले.

गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरीलाल मेनन यांच्या हस्ते कविवर्य रामाणी यांच्या जीवन आणि कार्यावरील दुर्मिळ छायाचित्रे,कविता यांचा समावेश असलेल्या प्रदर्शनाचे संस्कृती भवनमधील कला दालनात उदघाटन करण्यात आले.26 जून 1922 मध्ये बेती येथील ज्या घरात रामणींचा जन्म झाला होता ते घर,त्यांचे पुढील शिक्षण झाले ते लायसीएम विद्यालय, प्राथमिक शिक्षण झाले ते वास्को येथील सेंट जोसेफ स्कुल,1935 मध्ये त्यांच्या वडिलांनी वाडी-तळावली येथे बांधलेले घर,1945 मध्ये नदी परिवहन खात्यात ते दाखल झाले,पहिल्या पत्नी कमला 24 जून 1972 या दिवशी वारल्या व 7 जुलै 1972 ला त्यांनी लिलाबाई यांच्याशी दुसरा विवाह केला ,ही सर्व छायाचित्रे प्रदर्शनात मांडली आहेत.सातजणी, उन्हाचे आरसे झाले अशा काही त्यांच्या कविताही प्रदर्शनात वाचायला मिळतात.

Related Stories

राजधानीत आज कार्निव्हलची धूम

Amit Kulkarni

बायोमिथेनेशन प्रकल्प अजूनही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाही

Amit Kulkarni

आमदार कार्लुस आल्मेदा यांचा दाजी साळकर यांच्यावर बेकायदा जमीन हस्तांतरणाचा आरोप, जाहीरनाम्यावरही टीका

Amit Kulkarni

राज्यात दीपोत्सव उत्साहात

Amit Kulkarni

हाताला काम नाही..आणि पुरेशे जेवणही नाही..!

Patil_p

सीसीटीव्ही कॅमेऱयांसाठी मडगाव पालिकेला पुरस्कर्त्याची प्रतीक्षा

Amit Kulkarni