पूर्व चंपारण-मोतिहारीमध्ये 22 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ मोतिहारी
बिहारमध्ये पुन्हा एकदा विषारी दारूचे प्रकरण समोर आले आहे. मोतिहारी आणि पूर्व चंपारण जिह्यात पुन्हा एकदा बनावट दारूचा कहर पाहायला मिळाला. येथे 22 मद्यपींचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याचे शनिवारी उघड झाले. तसेच 10 हून अधिक लोक गंभीर अवस्थेत आहेत. विषारी दारू प्यायल्याने या सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मोतिहारीच्या तुर्कौलिया, हरसिद्धी आणि पहारपूरसह आजूबाजूच्या परिसरात या घटनेमुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटणा येथून एक विशेष पथक मोतिहारी येथे दाखल झाले आहे. यामध्ये 2 डीएसपी आणि 3 इन्स्पेक्टरसह 5 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
विषारी दारू सेवनामुळे अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्वांवर मोतिहारी आणि मुझफ्फरपूरच्या वेगवेगळ्या ऊग्णालयात उपचार सुरू आहेत. गुऊवारी जिह्यातील 35 गावांतील लोकांनी विविध ठिकाणी दारूचे सेवन केले होते. रात्रीपासून सर्वांची प्रकृती ढासळू लागली. दुसऱ्या दिवशी एकामागून एक दगावत गेल्याने शनिवारपर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. शुक्रवारी मृत्यूला सुऊवात झाली. सायंकाळपर्यंत 8 जणांना जीव गमवावा लागला. शनिवारी सायंकाळी हा आकडा 22 वर पोहोचला. कुटुंबीयांनी पोस्टमॉर्टम न करताच 7 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मठ लोहियार येथे 24 तासांत पिता-पुत्राचा मृत्यू झाला. नवल दास यांचे प्रथम निधन झाले, त्यानंतर मुलगा परमेंद्र दास यांचा मृत्यू झाला. तसेच हरिलाल सिंग यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना शहरातील एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले आहे.