Tarun Bharat

पोकोचा स्मार्टफोन लाँचिंग कार्यक्रम

या कार्यक्रमात दोन स्मार्टफोन सादर : किमत 30,000 रुपयांपेक्षा कमी राहणार

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisements

स्मार्टफोन कंपन्यांमधील एक महत्वाचा ब्रँड म्हणून पोको याला ओळखले जाते. या कंपनीने आता आपले नवीन दोन स्मार्टफोन बाजारात आणणार असल्याची माहिती आहे. यामध्ये पोको एफ4 व 5 जी आणि एक्स4 जीटी याचा समावेश राहणार आहे. सदरच्या स्मार्टफोनचे सादरीकरण ऑनलाईन स्वरुपात करण्यात येणार असून कंपनीच्या यूटय़ूब चॅनेलवर ते पाहता येईल. सदरचा हा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी सादर करण्यात येणार होता.

अभ्यासकांच्या माहितीनुसार पोको एफ 4 स्मार्टफोन रेडमी के40एस याचे अपडेट मॉडेल असणार आहे. हा स्मार्टफोन पोको एफ 3 चे ऍडव्हान्स मॉडेल बाजारात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

भारतात एकच स्मार्टफोन होणार सादर

पोको एफ 4 या मॉडेलची किमत ही 30000 रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता आहे. बाजारामध्ये हा फोन आयकू नीओ 6 आणि वनप्लस नॉर्ड2 टी या मॉडेलना टक्कर देण्याची शक्यता आहे. वनप्लस नॉर्ड 2 टी अजून बाजारात आलेला नाही. भारतीय बाजारात कंपनीने हे मॉडेल अजून आणलेले नाही. 27 जूनपासून पोको एफ 4 5 जी बाजारामध्ये उपलब्ध होणार आहे.

स्मार्टफोनमधील फिचर्स

  • पोको एफ4 5 जी 6.67 इंच पूर्ण एचडी डिस्प्ले
  • 120 हर्ट्स राहणार आहे.
  • स्नॅपड्रगन 870 प्रोसेसर
  • 120 जीबी रॅमसह 265 जीबी स्टोरेज

Related Stories

वन प्लस नॉर्डचा नवीन विक्रम

Patil_p

सॅमसंग ए 51 ची विक्री 60 लाखावर

Patil_p

सॅमसंगचा गॅलेक्सी एम-21 मॉडेल सादर

tarunbharat

सॅमसंग गॅलेक्सी एम 33 5जी लाँच

Patil_p

चिनी मोबाईल कंपन्यांचे उत्पादन घसरले

Patil_p

स्मार्टफोन ‘ओप्पो ए57’ भारतात दाखल

Patil_p
error: Content is protected !!