Tarun Bharat

पोलंडच्या स्वायटेकचे अग्रस्थान अधिक भक्कम

वृत्तसंस्था/ फ्लोरिडा

अलिकडे प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे अजिंक्यपद मिळविणारी पोलंडच्या इगा स्वायटेकने नुकत्याच जाहीर झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील महिला टेनिसपटूंच्या मानांकनातील आपले अग्रस्थान अधिक भक्कम केले आहे. मानांकनात स्वायटेक 8631 मानांकन गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. स्वायटेकने 2022 च्या टेनिस हंगामात सलग सहा स्पर्धा जिंकल्या आहेत. महिलां टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत कोंटावेट 4326 मानांकन गुणांसह दुसऱया, बेडोसा 4245 गुणांसह तिसऱया, जेबॉर 4150 गुणांसह चौथ्या, मारिया सॅकेरी 4016 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. अमेरिकेच्या 18 वर्षीय कोको गॉफने या मानांकन यादीत 13 वे स्थान तर पेगुलाने आठवे स्थान मिळविले आहे. महिला दुहेरीच्या मानांकन यादीत बेल्जियमच्या मर्टन्सने पुन्हा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे

Related Stories

पंतप्रधानांनी साधला पॅराऍथलेट्सशी सुसंवाद

Amit Kulkarni

युरो टी-20 स्लॅम पुन्हा एकदा लांबणीवर

Patil_p

न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाच्या सुरक्षेत वाढ

Patil_p

बीएआयकडून बॅडमिंटनपटूंना बक्षीस प्रदान

Patil_p

आर्चर वनडे मालिकेतून बाहेर

Patil_p

शेवटच्या कसोटीतून डी. ब्रुयेन बाहेर

Patil_p