ऑनलाईन टीम / तरुण भारत :
रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करत खडक पोलिसांनी 2700 किलो तांदूळ जप्त केला आहे. वेगवेगळय़ा रेशनिंग दुकानदारांकडून एकत्र करून तो वाहतूक केला जात असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आल्याची माहिती खडक पोलिसांनी बुधवारी दिली.
याप्रकरणी जावेद लालू शेख (वय 35), अब्बास अब्दुल सरकावस (34) आणि इम्रान अब्दुल शेख (30, सर्व रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई महेश प्रकाश जाधव यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपींवर जीवनाश्ययक वस्तू कायदा कलम 3 आणि 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी सोसायटी समोर कासेवाडी, भवानी पेठ येथे आरोपी जावेद शेख, इमरान शेख आणि अब्बास सरकावस हे वेगवेगळय़ा रेशनिंग दुकानदारांकडून काळय़ा बाजारात धान्य विकत घेऊन ते केडगाव ता. दौड येथे विक्री करीता घेऊन जात होते. या टेम्पोवर (एम एच 12 पी क्मयू 0582) छापा टाकून तीन लाखांच्या टेम्पोसह 40 हजार 500 रुपये किंमतीचा 2700 किलो तांदूळ (प्रतिकिलो 15 रुपये प्रमाणे) जप्त केला आहे. याबाबत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एच एम काळे करत आहेत.