Tarun Bharat

परीक्षा केंद्रात परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रोखणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सावंतवाडी/प्रतिनिधी- 

सावंतवाडी सांगेली येथील नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी काही पर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नाममात्र प्रवेश दिला जात असून, त्याद्वारे ते नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देत असल्याने, स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. याविरोधात शनिवारी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा केंद्राबाहेर शिवसेनेने निषेध आंदोलन केले असून, परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेरच रोखून धरले होते.

त्या विद्यार्थ्यांस परीक्षा देऊ देणार नाही, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. अशी भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी घेतली होती. यावेळी पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप करत. परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडले.


यावेळी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे पालक आणि शिवसैनिक यांच्यामध्ये शाब्दिक वाद देखील झाला होता. परंतु पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे. यावेळी निषेध आंदोलन करणाऱ्या सर्व शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Related Stories

कासार्डेत उड्डाण पुलाच्या भिंतीला तडे

NIKHIL_N

‘साहेब पाठीवर मारा, पण पोटावर मारू नका’

Patil_p

मादी बिबटय़ासह दोन बछडय़ांचा संचार

NIKHIL_N

‘गावठी’च्या वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

Patil_p

सडेजांभारीतील प्रसुती झालेल्या महिलेला कोरोना

Patil_p

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण रस्त्यांसाठी हवेत ६१६ कोटी

Archana Banage