Tarun Bharat

इराणमध्ये पोलीस प्रमुखाची हत्या

Advertisements

सैन्याकडून निदर्शकांवर कठोर कारवाईची शक्यता

वृत्तसंस्था / तेहरान

इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहेत. लाखो लोक रस्त्यांवर उतरली असून निदर्शनांदरम्यान संतप्त जमावाने एका पोलीस प्रमुखाची हत्या केली आहे. 16 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये रविवारपर्यंत 133 लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु सरकार आता या निदर्शनांना बळाचा वापर करत चिरडू शकते अशी भीती लोकांना सतावू लागली आहे अनेक शहरांना सुरक्षा दलांनी घेरले असून लोकांवर एके-47 आणि शॉटगन्सनी गोळय़ा झाडल्या जात आहेत.

कर्नल अब्दल्लाही असे नाव असलेल्या पोलीस प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. कुर्दिस्तानच्या मारिवानमध्ये अब्दल्लाही यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निदर्शकांच्या विरोधात कारवाई करत होते. मॉरल पोलिसांच्या कोठडीत कुर्द वंशीय युवती महसा अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये हिजाब अन् सरकारविरोधात निदर्शने होत आहेत.

पोलीस प्रमुखाच्या मृत्यूनंतर इराणचे सैन्य आयआरजीसी (इराण रिव्होल्युशनरी गार्ड कोअर) नरसंहाराचे अस्त्र उगारू शकते अशी भीती मानवाधिकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. सर्व कुर्दबहुल शहरांना सुरक्षा दलांनी घेरल्याची माहिती मानवाधिकार गट हेंगावने दिली आहे. निदर्शनांमध्ये मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या वाढण्यासोबत निदर्शकांच्या संतापातही भर पडत आहे. इराणमधील सर्व प्रमुख विद्यापीठांमध्ये निदर्शने सुरू आहेत. इराणच्या विद्यापीठांमध्ये सत्तासमर्थक विद्यार्थ्यांचेही गट असून निदर्शने करणाऱया विद्यार्थ्यांशी संघर्ष करत आहेत. तेहरानच्या विद्यापीठात विद्यार्थी अन् सुरक्षादलांमध्ये झटापट झाली आहे.

गुप्तचरप्रमुखाची हत्या

यापूर्वी सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांताची राजधानी जाहेदनामध्ये आयआरजीसीच्या वरिष्ठ अधिकाऱयाची निदर्शकांनी हत्या केली होती. 15 वर्षीय सुन्नी मुस्लीम मुलीवर झालेल्या बलात्काराच्या विरोधात बलूच समुदाय निदर्शने करत आहे. जाहेदान पोलीस प्रमुखावर या बलात्काराचा आरोप झाला आहे. 

Related Stories

रशियाची लस दिल्यावर अँटीबॉडीजची निर्मिती

Patil_p

रोहिंग्या मुस्लिमांचे बांगलादेशसमोर आव्हान

Patil_p

चेर्नोबिलमध्ये तैनात रशियाच्या सैनिकांचा जीव धोक्यात

Patil_p

कोरोनाची उलटी गणना चांगला संकेत

Omkar B

पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल खान कालवश

Patil_p

भारतातील नेजल वॅक्सिन मुलांसाठी ठरणार गेमचेंजर

datta jadhav
error: Content is protected !!