महाराष्ट्रातील शिवसैनिक गोव्यात येऊन गोंधळ घालण्याच्या शक्यतेने राज्य सरकार सतर्क
प्रतिनिधी /पेडणे
महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्यानंतर गुवाहाटी येथे असलेले शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांचे गोव्यात आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर कदाचित महाराष्ट्रातील शिवसैनिक गोव्यात येऊन गोंधळ घालतील, याची शक्मयता लक्षात घेऊन गोवा सरकारने पत्रादेवी बांदा, किरणपाणी आरोंदा व सातार्डा नईबाग या चेक नाक्मयांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवून कडक तपासणी सुरू केली आहे.
महाराष्ट्राच्या सीमेवरून गोव्यात येणाऱया प्रत्येक वाहनाची कडक तपासणी केली जाते. शिवसैनिक गोव्यात घुसण्याच्या शक्यतेने प्रत्येक नाक्यावर पोलिसांकडून योग्य प्रकारे चौकशी केली जात आहे.
पेडणे तालुका पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक, मोपा विमानतळ पोलिस निरीक्षक महेश केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. ते गुवाहाटी येथून या आमदारांचा गट उशिरापर्यंत गोव्यात पोचणार आहे. या पार्श्वभूमीवर पत्रादेवी-बांदा, सातार्डा-नईबाग आणि किरणपाणी-आरोंदा या तीन चेक नाक्मयांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. एखाद्या वेळी महाराष्ट्रातील शिवसैनिक ज्या ठिकाणी बंडखोर नेते आणि आमदार वास्तव्य करून राहाणार आहेत. त्याठिकाणी त्या हॉटेलात येऊन परिसरात गोंधळ घालण्याची शक्मयता लक्षात घेऊन हा पोलिस बंदोबस्त याठिकाणी वाढवलेला आहे.