बांधकाम व्यावसायिक खूनप्रकरण : पोलिसांवर हल्ला करून पलायनाचा प्रयत्न, गावठी पिस्तूल, चाकू जप्त


प्रतिनिधी/बेळगाव
रिअल इस्टेट व्यावसायिक राजू दोड्डबोम्मण्णावर (वय 41) मूळचा राहणार हलगा-बस्तवाड, सध्या राहणार भवानीनगर यांच्या खून प्रकरणातील फरारी आरोपीवर मंगळवारी पहाटे पोलिसांनी गोळीबार केला आहे. पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याच्यावर सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळीबार करण्यात आला आहे.
विशालसिंग विजयसिंग चव्हाण (वय 25) मूळचा राहणार चिक्कनंदिहळ्ळी, ता. कित्तूर, सध्या राहणार शास्त्राrनगर, दुसरा क्रॉस हा गोळीबारात जखमी झाला आहे. गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमणी यांनी विशालवर दोन गोळय़ा झाडल्या असून त्याच्या डाव्या पायाला इजा पोहोचली आहे.
पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना विशालसिंगने यासीन नदाफ (वय 29) या क्राईम ब्रँचच्या पोलिसावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस जखमी झाला आहे. विशालसिंग व यासीन या दोघा जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वीरभद्रनगर सर्कलजवळ हा थरार घडला आहे. 15 मार्च 2022 रोजी सकाळी रिअल इस्टेट व्यावसायिक राजू दोड्डबोम्मण्णावर याचा भवानीनगर परिसरात खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा जणांना अटक केली होती. अकरावा संशयित विशालसिंग चव्हाण हा फरारी होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रविंद्र गडादी आदी वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके कार्यरत होती.
विशालसिंग पश्चिम बंगालमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर बेळगाव पोलिसांचे एक पथक पश्चिम बंगाललाही गेले होते. मात्र, तो पोलिसांना सापडला नव्हता. सोमवारी मध्यरात्रीनंतर विशालसिंग वीरभद्रनगरजवळ मोटारसायकलवरून जात असल्याची माहिती मिळताच एसीपी एन. व्ही. बरमणी व त्यांच्या सहकाऱयांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
वीरभद्रनगरजवळील कोयला हॉटेलनजीक विशालसिंगला अडविण्यात आले. पोलिसांवर चाकूने हल्ला करून पलायनाच्या प्रयत्नात असताना त्याच्यावर दोन गोळय़ा झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याजवळून एक गावठी पिस्तूल, चाकू व पलायनासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. मार्केट पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
जखमी विशालसिंग व त्याच्या हल्ल्यात जखमी झालेला पोलीस यासीन या दोघांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. या घटनेनंतर मंगळवारी सकाळी मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. एसीपी सदाशिव कट्टीमनी, पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी आदी अधिकाऱयांनी घटनास्थळाची पाहणी केली. मंगळवारी सकाळी घटनास्थळावर बॅरिकेड्स उभे करण्यात आले होते.
तडीपारीसाठीही सुरू होते प्रयत्न
विशालसिंग चव्हाण याला तडीपार करण्यासाठी प्रक्रिया सुरू होती. 25 जानेवारी 2022 रोजी विशेष दंडाधिकाऱयांनी विशालसिंगला नोटीस बजावली होती. खडेबाजार पोलिसांनी त्याला तडीपार करण्यासंबंधी विशेष दंडाधिकाऱयांसमोर प्रकरण दाखल केले होते. महाराष्ट्र-कर्नाटकात एकूण नऊपेक्षा अधिक खून, खुनी हल्ला, खंडणी वसुली प्रकरणी त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत. कर्नाटक पोलीस कायदा 55 अन्वये त्याला तडीपार करण्यासाठी प्रक्रिया सुरू होती. 28 जानेवारी रोजी सकाळी त्याला विशेष दंडाधिकाऱयांसमोर हजर राहण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, त्या दिवशी तो हजर झाला नाही.
सात वर्षांनंतर गोळीबार
बेळगावात सात वर्षांनंतर पोलिसांनी गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. चेनस्नॅचिंगमुळे बेळगावात धुडगूस घालणाऱया इराणी टोळीतील सलीम शेरअली शेख (वय 30) याच्यावर 5 एप्रिल 2015 रोजी पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी ऑटोनगर येथील क्रिकेट स्टेडियमजवळ गोळीबार केला होता. या घटनेनंतर तब्बल सात वर्षांनी 21 जून 2022 रोजी एसीपी एन. व्ही. बरमणी यांनी विशालसिंग चव्हाण याच्या पायावर गोळय़ा झाडल्या आहेत.
बेळगावातील आजवरच्या एन्काऊंटरचा इतिहास
6 सप्टेंबर 2007 रोजी प्रवीण शिंत्रेचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला होता. जिल्हय़ात आतापर्यंत झालेल्या एन्काऊंटरचा आढावा घेतला असता 5 जानेवारी 1991 रोजी अथणी तालुक्मयातील शिरगुप्पी येथील उसाच्या फडात श्रीशैल व मल्लिकार्जुन चडचण टोळीचा म्होरक्मया अंबाजी पिरगोंडा हा विजापूर पोलिसांशी झालेल्या एन्काऊंटरमध्ये ठार झाला होता. अंबाजीने पत्नीसह शिरगुप्पी येथे आश्रय घेतला होता. हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथील संजय नेसरीकर याचे 23 जुलै 2001 रोजी कित्तूरनजीकच्या हिरेहळ्ळजवळ एन्काऊंटर झाले होते. मुंबई गुन्हेगारी जगतातील खतरनाक डॉन सुरेश मंचेकरचा एन्काऊंटर कोल्हापूरजवळ केला होता. तरी त्याला बेळगाव येथूनच उचलण्यात आले होते. 15 ऑगस्ट 2003 रोजी ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख रविंद्रनाथ आंग्रे यांनी त्याचा खात्मा केला होता. 16 जुलै 2005 रोजी गँगवाडी येथे राजू कणबरकर याचा एन्काऊंटर करण्यात आला होता. शेवटचा एन्काऊंटर प्रवीण शिंत्रेचा झाला होता. त्यानंतर पायावर गोळय़ा झाडण्याची प्रथा सुरू झाली आहे.