Tarun Bharat

‘विशालसिंग चव्हाण’वर पोलिसांचा गोळीबार..!

रिअल इस्टेट व्यावसायिक राजू दोड्डबोम्मण्णावर (वय 41) मूळचा राहणार हलगा-बस्तवाड, सध्या राहणार भवानीनगर यांच्या खून प्रकरणातील फरारी आरोपीवर मंगळवारी पहाटे पोलिसांनी गोळीबार केला आहे. पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयlनात असताना त्याच्यावर सर्व्हिस रिव्हॉव्हरने गोळीबार करण्यात आला आहे.

विशालसिंग विजयसिंग चव्हाण (वय 25) मूळचा राहणार चिक्कनंदिहळ्ळी, ता. कित्तूर, सध्या राहणार शास्त्रीनगर, दुसरा क्रॉस हा गोळीबारात जखमी झाला आहे. गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमणी यांनी विशालवर दोन गोळय़ा झाडल्या असून त्याच्या डाव्या पायाला इजा पोहोचली आहे.

Advertisements

पळून जाण्याच्या प्रयlनात असताना विशालसिंगने यासीन नदाफ ( वय 29 ) या क्राईम ब्रँचच्या पोलिसावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस जखमी झाला आहे. विशालसिंग व यासीन या दोघा जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वीरभद्रनगर सर्कलजवळ हा थरार घडला आहे.

Related Stories

रशियात कोरोनाबाधितांची संख्या 7 लाखांवर

datta jadhav

कर्नाटकात चौथी ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल

Abhijeet Shinde

हरयाणात 30 जून पर्यंत च्युईंगम विक्रीवर बंदी 

prashant_c

कर्नाटकातील ६३० ग्रामपंचायतींमध्ये सुरु होणार नवीन आधार केंद्रे

Abhijeet Shinde

हिरोळी येथे तरुणाचा खून, प्रेत टाकले बोरी पात्रात

Abhijeet Shinde

दिल्ली : मागील 24 तासात 7 मृत्यू; 135 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P
error: Content is protected !!